सौदी अरेबियात भीषण बस अपघात, 35 परदेशी प्रवाशांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:23 AM2019-10-17T10:23:16+5:302019-10-17T10:25:11+5:30
भीषण बस अपघातात 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 4 जण जखमी झाले आहेत.
रियाध (सौदी अरेबिया) - सौदी अरेबियातील पवित्र धार्मिक शहर असलेल्या मक्का येथे झालेल्या भीषण बस अपघातात 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले सर्व प्रवासी परदेशी नागरिक असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पोलिसांनी या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपासास सुरुवात केली आहे.
35 foreigners dead as bus crashes with excavator in Saudi Arabia, reports AFP quoting state media pic.twitter.com/GovAtj4mR0
— ANI (@ANI) October 17, 2019
सौदीमधील सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला असून, 4 जण जखमी झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता पवित्र शहर असलेल्या मक्काला जोडणाऱ्या मदिना येथे हा भीषण अपघात झाला. बस आणि कार यांच्यातील घडकेमुळे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमधून आशियाई आणि अरब नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती सरकारी वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ज्यामुळे टक्कर झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली.
#BREAKING | At least 30 pilgrims were killed and five injured in an accident between a bus and a car in #SaudiArabiapic.twitter.com/jQC43YEIWP
— Ahmed Jahaf احمد جحاف (@A7medJa7af) October 16, 2019
दरम्यान, पोलिसांनी दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपासास सुरुवात केली आहे. मात्र पोलिसांना अपघाताचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा अपघात मदिनापासू 170 किमी दूर हिजरा रोडवरील अल अखल गावाजवळ झाला. आपघातग्रस्त बसमधून 39 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 35 जाणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.