३५ टक्के तरुण जगताहेत आई-बापाच्या जिवावर! अमेरिकेतील सर्वेक्षणाने घातले अंजन; संपूर्ण खर्चापैकी ५८% पालकांकडून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 06:53 AM2023-02-03T06:53:46+5:302023-02-03T06:54:38+5:30
Family Income: पाश्चिमात्य देश पुढारलेले, तेथील तरुण वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच स्वत:च्या पायावर उभे राहतात, असे अनेक गैरसमज एका सर्वेक्षणाने खोटे पाडले आहेत.
न्यूयॉर्क : पाश्चिमात्य देश पुढारलेले, तेथील तरुण वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच स्वत:च्या पायावर उभे राहतात, असे अनेक गैरसमज एका सर्वेक्षणाने खोटे पाडले आहेत. त्यानुसार दहापैकी नऊ तरुण स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम समजतात; परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे.
अमेरिकेतील तरुण आपल्या ‘मॉम-डॅड’वर किती अवलंबून आहे हे यावरून लक्षात येते की, यामध्ये १९% भाडे व किराणा, दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारे २६% साहित्य पालकांकडून घेतले जाते. ७२% तरुणांना असा विश्वास आहे की ते पुढील २ वर्षांत स्वतःची काळजी घेण्यास सक्षम होतील; परंतु ३०% तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईपर्यंत असे काही करता येणार नाही, असे वाटते.
खर्च व्यवस्थापनात सक्षम नाहीत तरी...
n चार्टवे क्रेडिट युनियन सर्वेक्षणानुसार खर्च व्यवस्थापन करण्यास सक्षम नसतानाही, ६५% युवक चांगले क्रेडिट स्कोअर आर्थिक जबाबदारीचे सूचक मानतात.
n इतरांना कर्जाची कमतरता व त्यांच्या बचतीची रक्कम तितकीच महत्त्वाची वाटते. एका महिन्यात तरुणांना सरासरी ६ वेगवेगळी बिले आणि खर्च येतो. यामध्ये अन्न, विमा, इंटरनेट व भाडे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
तरुण बँक खाते उघडण्यातही मागे
सर्वेक्षणात असे आढळून आले की अमेरिकेतील जवळजवळ तीन चतुर्थांश तरुणांनी त्यांचे पहिले बँक खाते त्यांच्या २५ व्या वाढदिवसापूर्वी उघडले आणि २१% तरुणांनी वयाच्या १८ व्या वर्षापूर्वी बँक खाते उघडले. ३०% तरुण असे आहेत ज्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी खर्च करण्यास सुरुवात केली.
पाचपैकी २ तरुणांना अजूनही आर्थिक स्रोतांचा सामना करावा लागत आहे. इतर पिढ्यांच्या तुलनेत सर्वांत केवळ ११% वृद्ध आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत असताना, ५०% तरुणांना अनावश्यक खर्चावर मर्यादा घालण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे.