संग्रहालयातून ३५० मगरी वसाहतीत येण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 03:15 AM2017-08-30T03:15:55+5:302017-08-30T03:16:06+5:30
आग्नेय टेक्सासमधील मगरींसाठीच्या संग्रहालयातील पुराच्या पाण्याची पातळी वाढत जात असल्यामुळे तेथील सुमारे ३५० मगरी केव्हाही तेथून बाहेर पडू शकतात, असा सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे
टेक्सास : आग्नेय टेक्सासमधील मगरींसाठीच्या संग्रहालयातील पुराच्या पाण्याची पातळी वाढत जात असल्यामुळे तेथील सुमारे ३५० मगरी केव्हाही तेथून बाहेर पडू शकतात, असा सावधगिरीचा इशारा दिला गेला आहे. १५ एकरमध्ये हे गॅटोर नावाचे संग्रहालय पसरले असून, तेथील कामगार पाण्याच्या वाढत्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत. हार्वे नावाच्या प्रचंड वादळासह पाऊस झाल्यामुळे संग्रहालयाच्या उंच कुंपणाच्या दिशेने इंचाइंचाने पाणी चढत आहे. सुदैवाने, सोमवारी कोणतीही मगर बाहेर पडली नव्हती. संग्रहालयाचे कुंपण उंच असले तरी त्यापासून पाणी एक फुटापेक्षाही कमी उंचीवर गेले आहे. गॅरी सौरेज यांनी हे संग्रहालय २००५ मध्ये स्थापन केले. त्यांनी संग्रहालयाच्या परिसरात राहणाºयांना संग्रहालयातील सगळेच प्राणी तेथून निसटण्याची जोखीम नसल्याचे आश्वासन दिले आहे. चांगली बातमी अशी की, आम्ही आमच्या सगळ्या मगरींना व सगळ्या विषारी सापांना पकडले आहे, असे ते म्हणाले. सगळ्याच गोष्टी काही येथून होणार नाहीत आम्हाला सुरक्षित स्थळी हलावे लागेल. या संग्रहालयात १३ फुटांच्या दोन मगरी आहेत. त्यांना ट्रेलर्समध्ये ठेवण्यात आले असून, पूर ओसरून जाईपर्यंत त्यांना त्यातच ठेवले जाईल, असे सौरेज म्हणाले. पुराचे पाणी वाढतच राहिले तर बहुसंख्य मगरी बाहेर निसटण्याची जोखीम असल्याचे सौरेज यांनी मान्य केले. या संग्रहालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ४५० पेक्षा जास्त मगरी तेथे आहेत.