अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात ३६ ठार
By admin | Published: April 15, 2017 05:25 AM2017-04-15T05:25:56+5:302017-04-15T05:25:56+5:30
अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब हल्ल्यात इसिसचे ३६ हून अधिक अतिरेकी ठार झाले आहेत. अनेक बोगदे आणि बंकर
जलालाबाद : अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्ब हल्ल्यात इसिसचे ३६ हून अधिक अतिरेकी ठार झाले आहेत. अनेक बोगदे आणि बंकर या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत. अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
या हल्ल्यात मनुष्यहानी झाली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातून पळून इसिसमध्ये सहभागी झालेले २0 जण या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त असले तरी त्याला कोठूनही दुजोरा मिळालेला नाही. केरळमधील इसिसमध्ये गेलेला एक तरुण ठार झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र काहींच्या मते तो अन्यत्र ठार झाला. (वृत्तसंस्था)
या बॉम्बहल्ल्याची पूर्वकल्पना पाकिस्तान व अफगाणिस्तान यांना अमेरिकेने दिली होती. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनाने सांगितले की, मनुष्यहानी टाळण्यासाठी पूर्ण सावधानता बाळगण्यात आली. हा स्फोट ११ टन टीएनटीच्या स्फोटाशी समकक्ष होता. हवाई दलाचे प्रवक्ते कर्नल पॅट रायडर यांनी सांगितले की, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा नॉनन्यूक्लिअर बॉम्ब होता.
अमेरिकेने जीबीयू ४३ एमओएबी या बॉम्बने हा हल्ला केला. या बॉम्बला ‘मदर आॅफ आॅल बॉॅम्ब’ असेही संबोधले जाते. नांगरहार प्रांतात अचिन जिल्ह्यात मोमांद डारा भागात इसिसच्या ठिकाणांवर स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री साडेसात वाजता हा हल्ला करण्यात आला. ही मोहीम अतिशय यशस्वी झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.