व्हिएतनाममध्ये झालेल्या भूस्खलनात 37 लोकांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 01:35 PM2017-10-12T13:35:58+5:302017-10-12T14:30:07+5:30
उत्तर आणि मध्य व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून झालेल्या भूस्खलनात जवळपास 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूस्खलनात 40हून अधिक लोक बेपत्ता झालेत.
हनोई- उत्तर आणि मध्य व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून झालेल्या भूस्खलनात जवळपास 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूस्खलनात 40हून अधिक लोक बेपत्ता झालेत. परंतु बेपत्ता लोकांबद्दल अद्यापही कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. पुरामुळे व्हिएतनामचा उत्तर प्रांत प्रभावित झाला आहे.
व्हिएतनाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण घटनास्थळी दाखल झालं असून, बचावकार्य राबवत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 1000हून जास्त घरं नेस्तनाबूत झालीत. तसेच 6 प्रांत पूर्णतः प्रभावित झालीत. उत्तर आणि मध्य क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती उद्भवली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाऊस पडल्यानं व्हिएतनामचे कृषिमंत्री नागुएन जुआन यांनी सांगितलं आहे.
#BREAKING At least 37 people die and another 40 are missing after floods and landslides ravage northern and central Vietnam
— AFP news agency (@AFP) October 12, 2017
तर जवळपास 16740 घरांमध्ये पाणी भरलं आहे. तसेच पिकं आणि पायाभूत सुविधांनाही याचा फटका बसला आहे. उत्तरेकडच्या निन्ह बिन्ह प्रांतातील जवळपास 200000 लोकांना दुस-या ठिकाणी हलवलं आहे. उत्तरेकडच्या होआ बिन्ह प्रांतातल्या 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण अद्यापही बेपत्ता आहेत. अनेक कुटुंबातील माणसे रात्री झोपलेली असतानाच गाडली गेली आहेत.