३८ कोटी वर्षांपूर्वीच्या माशाचे हृदय जीवाश्मात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 07:16 AM2022-09-18T07:16:27+5:302022-09-18T07:16:51+5:30

पश्चिम ऑस्ट्रेलियातील गोगो फॉर्मेशनमध्ये शास्त्रज्ञांना एक अति प्राचीन जीवाश्म आढळले आहे.

38 million year old fish heart in fossil | ३८ कोटी वर्षांपूर्वीच्या माशाचे हृदय जीवाश्मात

३८ कोटी वर्षांपूर्वीच्या माशाचे हृदय जीवाश्मात

Next

लंडन : तब्बल ३८ कोटी वर्षांपूर्वीचे माशाचे हृदय जीवाश्मामध्ये आढळले असून, याद्वारे मानवाच्या शरीराच्या विकासावर प्रकाश टाकण्यास मदत मिळणार आहे, असे कर्टिन विद्यापीठातील शास्त्रज्ञांना वाटते.

पश्चिम ऑस्ट्रेलियातील गोगो फॉर्मेशनमध्ये शास्त्रज्ञांना एक अति प्राचीन जीवाश्म आढळले आहे. हे जगातील सर्वांत जुने म्हणजेच तब्बल ३८ कोटी वर्षांपूर्वीचे माशाचे हृदय आहे. प्रो. अहरबर्ग यांनी सांगितले की, थ्री डी प्रतिमांच्या अभ्यासातून कळते की, या माशाचे हृदय एस आकाराचे व दोन कक्षांचे होते. संशोधकांच्या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या प्रोफेसर केट ट्रिनाजस्टिक यांनी सांगितले, या प्राचीन जीवाश्मांमुळे कळते की, जबडा व जबड्याचे पृष्ठवंशी यांच्यात फार फरक होता. या माशांचे हृदय खरोखरच त्यांचे तोंड व त्यांच्या गालाखाली होते. आज शार्कचे तसेच आहे. याचे नमुने स्कॅन करण्यासाठी न्यूटॉन बीम व सिंक्रोटॉन एक्स-रेचा वापर करण्यात आला. 

आतडे, हृदय सुरक्षित
n शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा जीवाश्म जबडे असणाऱ्या एका माशाचा आहे. त्याचे पोट, यकृत, हृदय व आतडे सुरक्षित आहेत. 
n हे माशाचे हृदय असले तरी त्यामुळे मानवी शरीराच्या विकासावर प्रकाश टाकण्यास मदत मिळेल, असे संशोधनकर्त्यांना वाटते. या हृदयात दोन कक्ष आहेत. त्यातील छोटा कप्पा वर आहे. 
n हा जीवाश्म आधुनिक शार्क शरीर रचनेसारखा असावा. या जीवाश्माचे बहुतांश अवयव सुरक्षित आहेत, हे पाहून तर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: 38 million year old fish heart in fossil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.