इटलीत उड्डाणपूल कोसळून ३८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 04:03 AM2018-08-16T04:03:15+5:302018-08-16T04:03:39+5:30

इटलीच्या जिनोवा शहरात मंगळवारी आलेल्या वादळामुळे तेथील उड्डाणपुलाचा भाग कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला़ अपघात झाला तेव्हा ३०पेक्षा अधिक वाहने पुलावरून जात होती.

38 people die in the collapse of airliner in Italy | इटलीत उड्डाणपूल कोसळून ३८ जणांचा मृत्यू

इटलीत उड्डाणपूल कोसळून ३८ जणांचा मृत्यू

Next

रोम - इटलीच्या जिनोवा शहरात मंगळवारी आलेल्या वादळामुळे तेथील उड्डाणपुलाचा भाग कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला़ अपघात झाला तेव्हा ३०पेक्षा अधिक वाहने पुलावरून जात होती. ही सर्व वाहने पुलाच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. बचावकार्य अद्याप सुरू आहे.
इटलीचे उप परिवहन मंत्री एडोराडो रिक्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी उत्तर इटलीच्या ‘मोरांडी’ या १ कि.मी. उड्डाणपुलाचा २५० मीटरचा भाग अचानक कोसळला. आत्तापर्यंतची इटलीतील ही सर्वांत मोठी दुर्घटना आहे. काँक्रीटचा मोठा भाग पडल्याने आसपासच्या इमारतींना हादरा बसला आहे. त्यामुळे जवळपासच्या ११ इमारतींमधून ४००हून अधिक नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले़ इटलीचे परिवहन मंत्री डैनिलो टोनीनेल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर अपघातामागचे नेमके कारण समोर येईल़ पुलाच्या कंत्राटदाराचीही चौकशी करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)

१९६७ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. ९० मीटर उंच आणि १ किलोमीटर लांबीचा हा पूल फ्रान्सच्या दिशेने जाणाºया १०, तर उत्तर मिलानच्या दिशेने जाणाºया सात मुख्य मार्गांना जोडतो.

Web Title: 38 people die in the collapse of airliner in Italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.