धक्कादायक! स्टेजवर सादरीकरण करतानाच अभिनेत्याचा मृत्यू, प्रेक्षकांना वाटलं सीनच सुरू आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 02:53 PM2021-10-11T14:53:44+5:302021-10-11T14:54:52+5:30
यावेळी प्रेक्षकांचा असा समज झाला होता की, हा सगळा नाटकाचा भाग आहे. नाटकादरम्यान सेटचा सीन बदलताना कुलेशच्या अंगावर एक मोठा प्रॉप पडल्याने तो त्याखाली दबला.
स्टेजवर मोठमोठ्या बॅकड्रॉप, जड वस्तू यांच्यामुळे झालेल्या दुर्घटनेत रशियन (Russia) अभिनेता येवगेनी कुलेश (Yevgeny Kulesh)चा मृत्यू झाला. तो मॉस्कोतील (Moscow) प्रसिद्ध बोल्शई थिएटरमध्ये रंगमंचावर अभिनय करत होता. तेव्हाच अचानक झालेल्या दुर्घटनेत (Horrible accident) त्याचा वेदनादायी मृत्यू झाला. यावेळी प्रेक्षकांचा असा समज झाला होता की, हा सगळा नाटकाचा भाग आहे. नाटकादरम्यान सेटचा सीन बदलताना कुलेशच्या अंगावर एक मोठा प्रॉप पडल्याने तो त्याखाली दबला.
...मग ओरडू लागले प्रेक्षक
'द सन'च्या रिपोर्टनुसार शनिवारी मॉस्कोमध्ये जेव्हा कुलेश सादरीकरण करत होता तेव्हा तो प्रॉपखाली दबल्याने तिथे उपस्थित कलाकार घाबरले होते आणि त्यांनी मदतीसाठी तात्काळ अलार्म वाजवला. यानंतर प्रेक्षकांना सत्य काय ते समजलं आणि त्यांनी अॅम्बुलन्ससाठी व मदतीसाठी ओरडणं सुरू केलं. तेव्हाच स्टेजवर तात्काळ पडदा पाडण्यात आला. सोबतच प्रेक्षकांना हॉलबाहेर जाण्यास सांगण्यात आलं.
चुकीच्या ठिकाणी गेला कुलेश
सुरूवातीच्या वृत्तांनुसार सांगितलं जात आहे की, कुलेश सादरीकरण करत असताना चुकीच्या रस्त्यावर गेला होता. तेव्हाच ही घटना घडली. या घटनेचे अनेक वेदनादायी व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यात बाकीचे कलाकार घाबरलेले दिसत आहेत आणि तेथील कर्मचारी कुलेशच्या शरीरावरून प्रॉप हटवण्यासाठी मदत करत आहेत.