३९ वर्षांचे इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष

By admin | Published: May 9, 2017 12:38 AM2017-05-09T00:38:43+5:302017-05-09T00:38:43+5:30

फ्रान्समध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नॅशनल फ्रंटच्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अतिउजव्या विचारसरणीच्या मारिन ले पेन यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला.

The 39-year-old Emanuel Macroon French President | ३९ वर्षांचे इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष

३९ वर्षांचे इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष

Next

पॅरिस : फ्रान्समध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नॅशनल फ्रंटच्या इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अतिउजव्या विचारसरणीच्या मारिन ले पेन यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला.
मॅक्रॉन यांना ६६.१ टक्के, तर मारिन ले पेन यांना ३३.९ टक्के मते मिळाली. मॅक्रॉन (३९) हे नेपोलियन यांच्यानंतर फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मॅक्रॉन यांच्या विजयाने ब्रिटनपाठोपाठ फ्रान्सही युरोपीय संघातून बाहेर पडण्याची शक्यता दुरावली आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांना २,०७,५३,७९७ मते आणि मारिन ले पेन यांना १,०६,४४,११८ मते मिळाली. २५.४४ टक्के नागरिक मतदानापासून दूर राहिले. १९६९ नंतरच्या निवडणुकीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिक मतदानापासून दूर राहिले आहेत. मॅक्रॉन यांच्या विजयाचे वृत्त धडकताच त्यांच्या समर्थकांत उत्साहाला उधाण आले.
लाल, पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे तिरंगे झेंडे फडकावून समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. रविवारी रात्री हे निकाल जाहीर झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने समर्थक पॅरिस व अन्य शहरांत एकत्र आले. (वृत्तसंस्था)

Web Title: The 39-year-old Emanuel Macroon French President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.