थ्री डी प्रिंटरने साकारली जगातील सर्वात छोटी बोट, अनेक संरचनांपैकी एक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 04:53 AM2020-11-03T04:53:53+5:302020-11-03T04:54:46+5:30

the world's smallest boat : कृत्रिम स्वयंचलित मायक्रोस्विमर्सच्या काही विशिष्ट आकारांमुळे हालचाल आणि कर्षण (खेचून नेणारी क्रिया) याचा होणारा परिणाम आणि बॅक्टेरियांचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी हे संशोधन करण्यात आले.

The 3D printer created the world's smallest boat, one of many structures | थ्री डी प्रिंटरने साकारली जगातील सर्वात छोटी बोट, अनेक संरचनांपैकी एक

थ्री डी प्रिंटरने साकारली जगातील सर्वात छोटी बोट, अनेक संरचनांपैकी एक

Next

लंडन : जगातील सर्वात छोट्या बोटीची निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे. अवघ्या ३० मायक्रोमीटर्स लांबीची ही चिमुकली बोट माणसाच्या केसांमधूनही प्रवास करू शकते. नेदरलँडमधील लीडन विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने ही बोट तयार केली आहे.  
लहान कण जे द्रवातून हलू शकतात आणि मायक्रोस्कोपमध्ये टिपता येतात अशा मायक्रोस्विमर्सवर (सूक्ष्म तरणपटू) केल्या जात असलेल्या संशोधनांमधील अनेक संरचनांपैकी ही बोट एक आहे.  डच युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्रज्ञ डॅनिएला क्राफ्ट यांनी सांगितले की, आम्ही थेंबाच्या आतील लेसरवर लक्ष केंद्रित केले. या थेंबाच्या आतून लेसर हलवला तर आम्ही आम्हाला पाहिजे तशी रचना करू शकतो. 
 जैविक सूक्ष्मजंतू सूक्ष्मजीव आहेत जे बॅक्टेरिया, एकपेशीय वनस्पती आणि शुक्राणूंसह स्वतःला चालना देतात. कृत्रिम, स्वयंचलित मायक्रोस्विमरचा मानवी शरीरात औषधे वितरित करण्यासह अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो, असे क्राफ्ट यांनी सांगितले.  
कृत्रिम स्वयंचलित मायक्रोस्विमर्सच्या काही विशिष्ट आकारांमुळे हालचाल आणि कर्षण (खेचून नेणारी क्रिया) याचा होणारा परिणाम आणि बॅक्टेरियांचे वर्तन अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. 

औषध वितरण वाहन तयार करण्यासाठी एक चांगली प्रतिकृती काय असू शकते, हे आम्ही शिकतो आहोत. आपल्या शरीराच्या विशिष्ट भागात औषध पोहोचविण्यासाठी असे लहान कण असतील तर ते स्वयंचलितच असावे लागतील आणि त्याचवेळी ते शरीरातील वातावरणाशी मिळतेजुळते असावे लागतील. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. 
- डॅनिएला क्राफ्ट, भौतिकशास्त्रज्ञ 
 

Web Title: The 3D printer created the world's smallest boat, one of many structures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Londonलंडन