ब्रेक्झिटमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचं नुकसान

By admin | Published: June 24, 2016 12:23 PM2016-06-24T12:23:31+5:302016-06-24T12:27:52+5:30

ब्रिटनने युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांना तब्बल 4 लाख कोटींचं नुकसान झालं आहे

4 lakh crore loss to investors due to breakage | ब्रेक्झिटमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचं नुकसान

ब्रेक्झिटमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचं नुकसान

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 24 - ब्रिटनने युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा परिणाम बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांना तब्बल 4 लाख कोटींचं नुकसान झालं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बाजार उघडल्यानंतर काही मिनिटातंच गुंतवणूकदारांना हा फटका बसला आहे.  सोने आणि चांदीच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा दर 1700 रुपयांनी वाढला आहे. 
 
ब्रेक्झिटमुळे प्री ओपनिंग सेशन म्हणजे बाघार उघडण्याआधीच सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी गडगडला होता. पाऊंडने 31 वर्षातील निच्चांक गाठला होता. डॉलरच्या तुलनेत पाऊंड 9 टक्क्यांनी घसरला होता. सेन्सेक्सवरही याचा परिणाम झाला असून 1000 अंकांनी गडगडला होता. 26 हजाराच्या खाली सेन्सेक्स आला होता. निफ्टी आणि रुपयामध्येदेखील घसरण झाली होती. जपानमधील शेअर बाजारात ८ टक्क्यांनी घसरण झाली. तिथे सर्किट ब्रेकर लावून बाजाराचे काम दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. 
 
(ब्रिटनचा युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय)
(23 जून आपला स्वातंत्र्यदिन होऊ द्या - नीजेल फारएज)
 
हाँगकाँगचा शेअर बाजार दोन टक्क्यांनी घसरला. हँगसँगमध्ये तब्बल 1000 अंशांची घट नोंदवली गेली. चिनी बाजारही 50 अंकांनी घसरला. भारतीय शेअर बाजारातही १ हजार अंशांची घसरण नोंदवली गेली.
भारत, पाकिस्तान, बांगला देशातील उद्योजकांचा बाहेर पडण्याच्या भूमिकेला पाठिंबा आहे. कारण महासंघातील स्थलांतरितामुळे आशियाई लोकांना येथे नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. महासंघातून बाहेर पडल्यास त्यांच्यावर नियंत्रण येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्र मंडळींना इंग्लंडमध्ये आणता येईल अशी आशियाई नागरीकांची आशा आहे.इंग्लंड महासंघातून बाहेर पडल्यास त्याचा भारतावर देखील परिणाम होणार आहे. युरोपियन महासंघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जगभरातील शेअरबाजारांवर त्याचा परिणाम होणार असून भारताला अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.
ब्रेक्झिटचा भारतावर काय परिणाम होईल?
ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा म्हणजे ब्रेक्झिटचा निर्णय घेतला असल्याने  त्याचा परिणाम भारतासारख्या देशांवरही होणार आहे. 28 देश आणि 50 कोटी लोकसंख्येच्या युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था 16 खर्व डॉलर्सची असून तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातला वाटा एक चतुर्थांश इतका आहे. युरोपियन युनियन ही भारसाठी सर्वातमोठी बाजारपेठ आहे.
 
जवळपास 800हून अधिक भारतीय कंपन्यांची ब्रिटनमध्ये गुंतवणूक असून, त्यात आयटी, स्टील आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचा वाटा मोठा आहे. आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांची सहा ते अठरा टक्के कमाई ब्रिटनमधून होते. बहुतेक भारतीय कंपन्यांसीठी ब्रिटन हे युरोपचं प्रवेशद्वार बनलं आहे.
 
आता ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर या सर्व कंपन्यांना युरोपातील इतर देशांशी नव्यानं करार करावे लागतील. त्यामुळं खर्चात वाढ तर होईलच, शिवाय वेगवेगळ्या देशांत वेगळवेगळ्या कायद्यांनुसार काम करावं लागेल.
 
ब्रेक्झिटमुळं युरो आणि पाऊंड या चलनांमध्ये स्पर्धा सुरू होऊन त्यात डॉलरचा भाव वाढण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत रुपयाचं मूल्य घसरल्यानं कच्चं तेल, सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीला मोठा फटका बसेल. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यानं पर्यायानं भारतात महागाई आणखी वाढेल.
 

Web Title: 4 lakh crore loss to investors due to breakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.