चीनच्या गुहांमध्ये ४ कोटी लोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 02:29 AM2017-11-19T02:29:51+5:302017-11-19T02:29:59+5:30
चीनच्या उत्तरेकडील प्रांतांत तब्बल चार कोटी लोक आजही गुहासदृश घरांमध्ये राहतात, असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही; पण ती वस्तुस्थिती आहे. अगदी इ.स.पूर्व काळापासून डोंगरांत घरं बांधून चिनी लोक राहत आले आहेत.
चीनच्या उत्तरेकडील प्रांतांत तब्बल चार कोटी लोक आजही गुहासदृश घरांमध्ये राहतात, असं सांगितलं तर कोणाचा विश्वास बसणार नाही; पण ती वस्तुस्थिती आहे. अगदी इ.स.पूर्व काळापासून डोंगरांत घरं बांधून चिनी लोक राहत आले आहेत. ती अगदी गुहेसारखीच दिसतात. या घरांना योडाँग म्हटलं जातं आणि त्यात राहणा-यांना योडांगस म्हणून ओळखलं जातं. गान्सू, शँक्झी, हेनन व निंगझिया या भागांत अशी घरं दिसतात. ही घरं उन्हाळ्यात आतून थंड राहतात आणि थंडीत आतमध्ये ऊबदार वाटतं. मध्यप्रदेशात ग्वाल्हेर सोडून चंबळच्या खोºयात शिरल्यावर जी बिहड (मातीची घरं) दिसू लागतात, तसंच चित्र चीनच्या उत्तरेकडील भागांत दिसतं. अर्थात तिथं फरक इतकाच की ती थेट डोंगरातच आहेत. चीनमध्ये १९५६ रोजी भूकंपाचा खूप मोठा धक्का बसला. त्यावेळी डोंगरही खचले आणि शँक्झी प्रांतात योडाँगमध्ये राहणारे ८ लाख १० हजार लोक ठार झाले होते.