अचानक गायब झाला होता ४ वर्षाचा मुलगा, पोलिसांनी खेळण्याचा बॉक्स उघडून पाहिला तर बसला धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:28 PM2021-08-03T14:28:51+5:302021-08-03T14:29:19+5:30
४ वर्षीय मुलगा अशाप्रकारे अचानक घरातून गायब झाल्याने परिवारातील सदस्य चिंतेत पडणं स्वाभाविक होतं. त्यांनी आजूबाजूला मुलाला शोधायला सुरूवात केली.
लहान मुलांना त्यांच्या वेगळ्या रूममध्ये झोपवणं ठीक आहे. पण अनेकदा असं करणं महागातही पडू शकतं. अशीच एक घटना ब्रिटनमधून समोर आली आहे. इथे एका परिवारातील एक मुलगा रात्री आपल्या रूममध्ये झोपला होता. पण त्याचे आई-वडील सकाळी उठून त्याच्या रूममध्ये गेले तर तो रूममध्ये नव्हता.
४ वर्षीय मुलगा अशाप्रकारे अचानक घरातून गायब झाल्याने परिवारातील सदस्य चिंतेत पडणं स्वाभाविक होतं. त्यांनी आजूबाजूला मुलाला शोधायला सुरूवात केली. जेव्हा त्यांना मुलगा कुठेच आढळला नाही तेव्हा ते पोलिसांकडे गेले. नंतर पोलिसही मुलाला शोधण्यासाठी इकडे-तिकडे फिरले. मुलाचा शोध ठिकठिकाणी घेतला जात होता. पण कुणालाच हे माहीत नव्हतं की, तो अशा ठिकाणी सापडेल ज्याची कुणालाही अंदाज नव्हता.
कॅशे नावाचा मुलगा शोधण्यासाठी पोलिसांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होती. आधीतर कॅशेच्या नॉन कस्टोडिअल पालकांना विचारण्यात आलं की, कॅशे तुमच्याकडे आहे का. पण जेव्हा तो तिथे सापडला नाही तेव्हा तपास सुरू केला गेला. मुलाच्या आईने त्याला रागावलं तर नाही ना याचीही चौकशी करण्यात आली. नंतर पोलिसांनी परिवाराच्या स्टेटमेंटच्या आधारावर त्याचा शोध सुरू केला. त्यांना मुलाच्या रूममध्ये खेळण्याचा एक बॉक्स सापडला.
जेव्हा पोलिसांना खेळण्याचा बॉक्स दिसला तर त्यांनी तो उघडून पाहिला. ४ वर्षीय मुलाचा मृतदेह त्याच बॉक्समध्ये होता. मुलाच्या वडिलांनी, आजीने आणि सावत्र आईने हा नजारा पाहिला तर त्यांना धक्का बसला. मुलगा गायब झाल्याची तक्रारही त्याच्या आजीने दिली होती. अशात पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, त्याचा मृत्यू positional asphyxiation मुळे झाला. म्हणजे मुलगा जास्त अशा पोजिशनमध्ये राहिला की, त्याला योग्यप्रकारे ऑक्सीजन मिळत नव्हतं.