इराणमध्ये विमान कोसळून ४० प्रवासी ठार

By Admin | Published: August 10, 2014 01:09 PM2014-08-10T13:09:40+5:302014-08-10T13:09:40+5:30

इराणमधील मेहराबाद येथे प्रवासी विमान कोसळल्याने विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह एकूण ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

40 people killed in Iran plane collision | इराणमध्ये विमान कोसळून ४० प्रवासी ठार

इराणमध्ये विमान कोसळून ४० प्रवासी ठार

googlenewsNext

ऑनलाइन टीम

तेहरान, दि. १० - विमान अपघातांची मालिका सुरुच असून रविवारी सकाळी इराणमधील तेहरान येथे प्रवासी विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्स आणि प्रवासी अशा सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवली जात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

इराणमध्ये एअरक्राफ्ट इराण १४० या विमानाचा वापर डॉमेस्टीक उड्डाणासाठी केला जातो. रविवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास या विमानाचे मेहराबाद विमानतळाहून तबसच्या दिशेने उड्डाण झाले. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान पश्चिम तेहरानजवळ कोसळले. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. विमानात क्रू मेंबर्स आणि प्रवासी असे सुमारे ४० जण प्रवास करत होते. यात सात लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते. मात्र विमानात नेमके किती प्रवासी होते याचा आकडा अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही.  विमानातील सर्व प्रवासी व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची भिती वर्तवली जात आहे. या विमानाची प्रवासी क्षमता ५२ आहे. 

इराणमधील बहुतांशी विमान हे १९७९ मध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीच्या पूर्वी विकत घेण्यात आले होते. त्यामुळे इराणमधील अनेक विमानांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याचे जाणकार सांगतात. 
 

Web Title: 40 people killed in Iran plane collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.