अलास्काला 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तीव्र धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 11:46 AM2018-12-01T11:46:30+5:302018-12-01T11:52:20+5:30

अलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीपला 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे.

40 plus aftershocks rattle alaska after major earthquake | अलास्काला 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तीव्र धक्का

अलास्काला 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तीव्र धक्का

Next
ठळक मुद्देअलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीपला 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे.भूकंपांमुळे अलास्कातील अनेक रस्ते खचले आहेत.भूकंपाचं केंद्र एंकोरेज या शहराच्या उत्तरेला 7 मैलावर होतं.

केनाई - अलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीपला 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. या भूकंपानंतर 'नॅशनल ओशियनिक अॅण्ड अॅटमोस्फियरिक एडमिनिस्ट्रेशन' यांच्याकडून त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, उत्तर अमेरिकेतील कॅनेडियन क्षेत्राचं मूल्यांकन केल्यानंतर त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला. 

भूकंपांमुळे अलास्कातील अनेक रस्ते खचले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. अलास्का भूकंपाने हादरले. याचा फटका परिसरातील जवळपास 10 हजाराहून अधिक नागरिकांना बसला आहे. 

भूकंपामुळे परिसरातील अनेक इमारती आणि पूल कोसळले आहेत. तसेच रस्त्यांनाही मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. भूकंपाचं केंद्र एंकोरेज या शहराच्या उत्तरेला 7 मैलावर होतं. भूकंपामुळे 40 वेळा कंपनं जाणवली. तसेच यानंतर परिसरातील वीजपुरवठा हा खंडीत करण्यात आला.  एंकोरेज आणि परिसरातील क्षेत्रात सुमारे 4 लाख नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
 

Web Title: 40 plus aftershocks rattle alaska after major earthquake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthquakeभूकंप