लिबियात बोट उलटल्यानं ४०० जणांचा बुडून मृत्यू
By admin | Published: April 15, 2015 04:01 AM2015-04-15T04:01:01+5:302015-04-15T04:01:01+5:30
लिबियाहून इटलीकडे जाणारी बोट भर समुद्रात बुडाल्याने बोटीमधून प्रवास करणा-या ४०० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
ऑनलाइन लोकमत
रोम, दि. १५ - लिबियाहून इटलीकडे जाणारी बोट भर समुद्रात बुडाल्याने बोटीमधून प्रवास करणा-या ४०० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
'सेव्ह दी चिल्ड्रेन' नावाच्या एका सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लिबियाहून अनधिकृतपणे स्थलांतरीत ५५० कामगारांना घेवून बोट इटलीकडे जात होती. परंतू ही बोट भूमध्यसागरजवळ येताच या बोटीला अपघात झाला व ही बोट बुडाल्यानं यामधून प्रवास करणा-या ४०० स्थलांतरीत कामगारांचा बुडून मृत्यू झाला आहे. या अपघातात बचावलेल्या १५० जणांना इटलीच्या दक्षिणी पोर्टवर आणण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली आहे. अशा घटना याआधीही सुध्दा घडल्या असून याआधी आफ्रिकामध्ये ५०० जणांचा बुडून मृत्यू झाला होता तर २०१४ मध्ये ४७ जणांना जलसमाधी मिळाली होती अशी माहिती जीनिव्हा स्थित असलेल्या व स्थलांतरासाठी काम करणा-या एका संस्थेने दिली.