इस्नयलच्या हल्ल्यात 44 पॅलेस्टिनी ठार

By admin | Published: July 10, 2014 02:45 AM2014-07-10T02:45:22+5:302014-07-10T02:45:22+5:30

इस्नयलने बुधवारी गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात 17 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून, त्यात महिला व मुलांची संख्या जास्त आहे.

44 Palestinians killed in Israeli attack | इस्नयलच्या हल्ल्यात 44 पॅलेस्टिनी ठार

इस्नयलच्या हल्ल्यात 44 पॅलेस्टिनी ठार

Next
गाझा-जेरुसलेम : इस्नयलने बुधवारी गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात 17 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून, त्यात महिला व मुलांची संख्या जास्त आहे. इस्नयलच्या हवाई हल्ल्यात मृतांची एकूण संख्या आता 44 झाली आहे. तर पॅलेस्टिनी संघटना हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात संपूर्ण इस्नयल सापडले आहे. दोन्ही शेजारी देशात प्रथमच मोठा संघर्ष उफाळला आहे. 
इस्नयल व पॅलेस्टिन यांच्यात सामायिक असणा:या गाझा पट्टीचे दोन भाग असून, एक इस्नयलच्या ताब्यात आहे, तर दुसरा गेल्या सात वर्षापासून हमासच्या ताब्यात आहे. हमासच्या ताब्यातील गाझा पट्टीवर बुधवारचा दिवस हा नोव्हेंबर 2क्12 नंतरचा सर्वात रक्तरंजित दिवस ठरला आहे. इस्नयलने हमासचे रॉकेट हल्ले रोखण्याकरीता 118 रॉकेट प्रक्षेपकावर हल्ला केला आहे. इस्नयलच्या ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह अंतर्गत ही कारवाई सुरु आहे. हमास संघटनेने केलेल्या हल्ल्यात 18क् रॉकेट्सचा मारा करण्यात आला आहे. ङिाचोरेन याकोव या गाझा पट्टीपासून 12क् कि.मी. अंतरावर असणा:या शहराचे सायरन रॉकेटचा इशारा देण्यासाठी वाजत होते. याचाच अर्थ असा की, हमासची रॉकेट आता इस्नयलवर कोठेही हल्ला करु शकतात. ही मोहीम सुरु झाल्यापासून इस्नयलवर 225 रॉकेट आदळली आहेत. 2क् रॉकेट इस्नयलच्या रॉकेट विनाशक यंत्रणोने पाडली असून, तीन रॉकेट जेरूसलेमवर पडली आहेत. बुधवारी मरण पावलेल्या  पॅलेस्टिनी नागरिकात एक दहशतवादी होता, सहा मुले आणि पाच महिला होत्या. इस्नयलने गाझा किनारपट्टीवर 16क् बॉम्बहल्ले केले असून, त्यात हमासचे दहशतवादी मुहम्मद शिनवार व रायेद अत्तार  यांच्यासह हमास नेत्यांची आठ घरे लक्ष्य केली आहेत. इस्नयलच्या सुरक्षा दलाच्या अधिका:यांची घरे हमासने लक्ष्य केली आहेत. जेरूसलेम येथे रॉकेट आदळण्यापूर्वी सायरन वाजत होते, पण रहिवाशांचे फारसे लक्ष नव्हते. त्यामुळे तीन स्फोटानी हे पवित्र शहर ढवळून निघाले. पण या हल्ल्यात जिवितहानी झाली नाही. हमासची लांब पल्ल्याची रॉकेट तेल अवीव व जेरुसलेम शहरावर आदळली. आतार्पयत हा सुरक्षित भाग मानण्यात येत असे. 
गाझा पट्टीपासून 4क् कि.मी. अंतरावरील शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या. गाझा सीमेजवळ राहणा:या इस्नयली नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली. (वृत्तसंस्था)
 
4पॅलेस्टिनच्या ताब्यातील पश्चिम किनारपट्टीवर गेल्या आठवडय़ात इस्नयलच्या तीन किशाोरवयीन मुलांची हत्या झाली तर एका पॅलेस्टिनी किशोरवयीन मुलाची जेरूसलेम येथे हत्या झाली. त्यावरुन हा संघर्ष उफाळला आहे.
 
4 इस्नयली मुलांचे अपहरण व हत्या हमासने केली असा इस्नयलचा आरोप आहे. हमासने त्याचा इन्कार केला आहे. इस्नयली मुलांच्या दफनविधीनंतर पॅलेस्टिनी मुलाचे अपहरण झाले व त्याला ठार मारण्यात आले. पोलिसांनी सहा ज्यू संशयिताना अटक केली आहे. 

 

Web Title: 44 Palestinians killed in Israeli attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.