४.६० लाख मधमाशांकडून डंख मारून घेतले

By admin | Published: April 27, 2017 01:03 AM2017-04-27T01:03:53+5:302017-04-27T01:03:53+5:30

अत्यंत धोकादायक व धाडसी कामे (स्टंट) करणारे अनेक जण आहेत; परंतु शी पिंगसारखा बघितला नसेल. मधमाशांच्या पोळ्यातून

4.60 lakhs beekeeped by bees | ४.६० लाख मधमाशांकडून डंख मारून घेतले

४.६० लाख मधमाशांकडून डंख मारून घेतले

Next

अत्यंत धोकादायक व धाडसी कामे (स्टंट) करणारे अनेक जण आहेत; परंतु शी पिंगसारखा बघितला नसेल. मधमाशांच्या पोळ्यातून मध काढणे धोकादायकच असते. एकही माशी डसली तर काम बिघडू शकते; परंतु शी पिंग याने एखाद्दुसऱ्या नव्हे, तर ४,६०,००० मधमाशांकडून स्वत:ला डंख मारून घेतले. त्याने अनेक तास मधमाशांना स्वत:च्या अंगावर लावून ठेवले. यामागे त्याचा उद्देश होता तो हा की, या धाडसामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतील व आपल्याकडून मध विकत घेतील. शी पिंग हा मधाचा व्यावसायिक आहे व आपला व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने हा खेळ खेळला. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने भर रस्त्यात स्वत:च्या अंगावर ४,६०,००० मधमाशांना सोडले व त्यांच्याकडून चाववून घेतले. हे करताना त्याने डोके झाकून घेतले होते. त्या मधमाशांचे वजन ४५ किलो होते. मधमाशांमुळे त्याचे शरीर मूर्तीसारखे दिसत होते.

Web Title: 4.60 lakhs beekeeped by bees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.