कच-याचा डोंगर कोसळला, 48 जणांचा मृत्यू तर शेकडो बेपत्ता
By Admin | Published: March 13, 2017 08:01 PM2017-03-13T20:01:47+5:302017-03-13T20:03:52+5:30
आफ्रिकेतील देश इथियोपियाची राजधानी आदिस अबाबामध्ये कच-याचा डोंगर कोसळल्याने 48 जणांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
आदिस अबाबा, दि. 13 - आफ्रिकेतील देश इथिओपियाची राजधानी आदिस अबाबामध्ये कच-याचा डोंगर कोसळल्याने 48 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडल्याची माहिती येथील अधिका-यांनी दिली. या घटनेमध्ये शेकडो जण अजुनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.
गेल्या 5 दशकांपासून अदिस अबाबाच्या या ठिकाणी कचरा फेकला जात होता असं वृत्त आहे. शहरातील हा सर्वात मोठा कच-याचा ढिगारा होता. ढिगा-याच्या आजूबाजूला कामगारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेली अनेक घरं या ढिगा-याखाली गाडली गेली आहेत.
घटनेच्यावेळी 100 हून अधिक जण तेथे उपस्थित होते. त्यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृतकांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश आहे.