चक्रीवादळाच्या शक्यतेने 5 लाख लोकांना हलवले
By admin | Published: July 9, 2014 01:13 AM2014-07-09T01:13:31+5:302014-07-09T01:13:31+5:30
निओगुरी वादळ जपानकडे सरकले असून, अधिक शक्तिशाली बनलेल्या या वादळाचा तडाखा दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटांच्या साखळीला बसण्याची शक्यता आहे.
Next
टोकिओ : निओगुरी वादळ जपानकडे सरकले असून, अधिक शक्तिशाली बनलेल्या या वादळाचा तडाखा दक्षिण जपानमधील ओकिनावा बेटांच्या साखळीला बसण्याची शक्यता आहे. जपानच्या हवामान खात्याने भीषण चक्रीवादळाचा इशारा दिला असून, पाच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
भीषण चक्रीवादळ म्हणजे जीवाला धोका असे समजले जात असून, वादळाची शक्ती वाढल्याने धोकाही तीव्र झाला आहे. दर ताशी 25क् किलोमीटर वेगाने येणा:या या वादळाचा तडाखा ओकिनावाच्या मुख्य बेटाला बसेल, असा इशारा सोमवारी रात्री उशिरा देण्यात आला आहे. ओकिनावा बेटावर 12 लाख लोकवस्ती असून, शेजारच्या मियाको बेटानांही वादळाचा धोका आहे.
वादळामुळे समुद्राच्या लाटा 14 मीटर्पयत (45 फूट) उंच जातील, असा अंदाज असून ओकिनावा भागातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तसेच हवाई व सागरी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ओकिनावा बेटावरील 65क्क् घरांची वीज मंगळवारी बंद झाली आहे.
हैयान वादळाच्या तडाख्यानंतर वर्षभराच्या आत हे दुसरे चक्रीवादळ येत आहे. हैयान वादळात नोव्हेंबर महिन्यात फिलिपीन्समध्ये 7,3क्क् लोक मरण पावले वा बेपत्ता झाले आहेत. जोरदार वाहणारे वारे, उंच सागरी लाटा व कधीही अनुभवला नव्हता असा पाऊस येईल, असे जपानच्या हवामान खात्याचे प्रमुख सातोषी एबीहारा यांनी सोमवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आपण कठीण परिस्थितीला सामोरे जात असून भीषण धोक्याला तोंड देत आहोत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)