धक्कादायक! कोरोना वॅक्सीनसाठी तब्बल ५ लाख शार्कची केली जाणार हत्या, वापरलं जाणार माशाचं तेल
By अमित इंगोले | Published: October 2, 2020 01:08 PM2020-10-02T13:08:40+5:302020-10-02T13:08:55+5:30
जगभरात वॅक्सीनचे डोज तयार करण्यासाठी शार्कच्या शरीरात मिळणाऱ्या खास तेलाचा वापर केला जातो. त्यामुळे ५ लाख शार्कचा जीव धोक्यात आहे.
कोरोना महामारीमुळे मनुष्य आपला जीव गमावत आहेत आणि आता जनावरांचा जीव धोक्यात आला आहे. वन्यजीव संरक्षकांनी सूचना जारी केली आहे की, कोरोना वॅक्सीनसाठी तब्बल ५ लाख शार्कची हत्या केली जाईल. जगभरात वॅक्सीनचे डोज तयार करण्यासाठी शार्कच्या शरीरात मिळणाऱ्या खास तेलाचा वापर केला जातो. त्यामुळे ५ लाख शार्कचा जीव धोक्यात आहे.
शार्कच्या तेलाचा वॅक्सीनमध्ये वापर
द वेदर चॅनलच्या रिपोर्टनुसार, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कोरोनापासून वाचण्यासाठी वॅक्सीनचा डोज दिला जाणार आहे. जर प्रत्येक व्यक्तीला दोन डोज दिले गेले तर ५ लाख शार्कला मारलं जाईल. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की शार्कच्या लिव्हरमध्ये नैसर्गिक तेल स्क्वेलिन आढळतं. जे कोरोना वॅक्सीनचे डोज तयार करण्यासाठी वापरण्याची घोषणा केली गेली आहे.
अॅंटीबॉडी बनतील आणि इम्यूनिटी मजबूत होईल
स्क्वेलिनला लिव्हर आईलही म्हणतात. याच्या वापराने वॅक्सीनचा डोज मानवी शरीरात मोठ्या प्रमाणात अॅंटीबॉडी तयार होतील आणि व्हायरस विरोधात इम्यून सिस्टीम मजबूत होईल. याने व्हायरस नष्ट होण्यासोबतच जास्त काळासाठी शरीर सुरक्षित राहिल. एक टन लीटर ऑईल स्क्वेलिन मिळवण्यासाठी साधारण ३ लाख शार्क माराव्या लागतील.
फ्लूच्या वॅक्सीनमध्ये आधीपासून होतो वापर
जगातली प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी ग्लॅक्सो स्मिथलाइनने कोरोना वॅक्सीनचे १ अब्जांपेक्षा जास्त डोज तयार करण्याची घोषणा केली आहे. या डोजमध्ये लिव्हर ऑईल स्क्वेलिनचा वापर करण्याची शक्यता आहे. ग्लॅक्सो स्मिथलाइन आधीपासूनच फ्लूच्या वॅक्सीनच्या डोजमध्ये लिव्हर ऑईलचा वापर केला जातो.
समुद्राचं इको सिस्टीम बिघडेल
शार्क मासे संरक्षणाच काम करणाऱ्या शार्क एलाइस नावाच्या कॅलिफोर्नियातील संस्थाने इशारा दिला आहे की, जर असं झालं तर समुद्राच्या इकोसिस्टमचं मोठं नुकसान होईल. संस्थेने सांगितले की, जगात प्रत्येक व्यक्तीला जर कोरोना वॅक्सीनचे दोन डोज दिले तर लिव्हर ऑईल स्क्वेलिनसाठी ५ लाख शार्कना मारलं जाईल.
कॉस्मेटिकसोबत अनेक प्रॉडक्टमध्ये होतो वापर
रिपोर्टनुसार शार्कसोबत इतरही काही प्राण्यांमध्ये लिव्हर ऑईल आढळून येतं. पण शार्कमध्ये याचं प्रमाण अधिक असतं. याचा औषध म्हणून अनेक प्रॉडक्टमध्ये वापर केला जातो. सध्या याचा सर्वात जास्त वापर कॉस्मेटिक प्रॉडक्ट, मशीनचं तेलासहीत अनेक प्रॉडक्टमध्ये केला जातो.