जगभरातील ५0 कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 06:45 AM2020-09-25T06:45:49+5:302020-09-25T06:46:46+5:30
कोरोनाचा परिणाम : कामाच्या तासांत १७ टक्के घसरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘आंतरराष्ट्रीय श्रम संस्थे’च्या (आयएलओ) अहवालानुसार, कोरोना महामारीमुळे जगभरातील ५0 कोटींपेक्षा अधिक लोकांना आपल्या नोकºया गमवाव्या लागल्या आहेत.
‘आयएलओ’ ही संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे. संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कोरोनामुळे छोट्या असो वा मोठ्या, सर्वच व्यवसायांना फटका बसला आहे. जगभरात किमान ५0 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. कामाच्या तासांत झालेल्या कपातीनुसार आयएलओने हा अंदाज व्यक्त केला आहे.
- कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यास स्थिती आणखी बिघडू शकते
- कोरोनाचे आर्थिक, सामाजिक व रोजगारावरील परिणामांवर मात करण्यास विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक
- तत्काळ आणि व्यापक प्रमाणावर कृती करावी लागेल
यापूर्वीच्या संकटांपेक्षाही भयंकर स्थिती
2019-20
च्या तुलनेत चालू वित्त वर्षाच्या दुसºया तिमाहीत कामाच्या तासांत १७% घसरण झाली.
‘आयएलओ’ने म्हटले की, कोरोनाच्या बाबतीत बेरोजगारीविषयी जे आकलन आधी करण्यात आले होते, त्यापेक्षा प्रत्यक्षातील आकडे खूपच अधिक आहेत.
विकसनशील देशांमध्ये स्थिती अत्यंत वाईट आहे. तेथील नोकºया जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यापूर्वी आलेल्या आर्थिक संकटापेक्षाही हे भयंकर आहे.
विकसनशील देशांतील कामगारांच्या उत्पन्नातही १५ टक्के घट झाली आहे.
श्रमिकांच्या उत्पन्नात १0.७ टक्के घट
‘आयएलओ’चे महासंचालक गाय रायडर यांनी सांगितले की, श्रम बाजारातील हानी भीषण आहे. २0२0 वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत जागतिक पातळीवर श्रमिकांचे उत्पन्न १0.७ टक्क्यांनी घसरून ३.५ लाख कोटी डॉलरवर आले आहे. ही घसरण २0१९ च्या पहिल्या तीन तिमाहींतील जागतिक जीडीपीच्या ५.५ टक्के आहे. आकडेवारीत साथकाळात सरकारने केलेल्या मदतीचा समावेश नाही.