२४ तासांत जगात भूकंपाचे ५० धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 06:27 AM2020-06-15T06:27:37+5:302020-06-15T06:27:50+5:30
जपानच्या रेयुक्यू बेटावर ६.६ तीव्रतेचा तर, तैवान भागात ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मरीन बेटांवर ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. इंडोनेशियातील बेटांवर ५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
नवी दिल्ली : गत २४ तासात जगात भूकंपाचे ५० धक्के बसले आहेत. जपानच्या रेयुक्यू बेटावर ६.६ तीव्रतेचा तर, तैवान भागात ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मरीन बेटांवर ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. इंडोनेशियातील बेटांवर ५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
देशात अन्य दोन बेटांवर ४.९ आणि ४.८ तीव्रतेचा भूकंप झाला. तुर्कीच्या पूर्व भागात ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला. फिजीमधील बेटावर ४.८ तीव्रतेचा तर, म्यानमारमध्ये ४.८ तीव्रतेचा भूकंप झाला. गुजरातेत चार शहरात भूकंपाचे धक्के गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यात भरुचजवळ रविवारी ५.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. इन्स्टिस्ट्यूट आॅफ सीस्मोलॉजिकल रिसर्चने (आयएसआर) सांगितले की, रविवारी रात्री ८.१३ च्या सुमारास भूकंपाचा हा धक्का बसला.
कच्छ, राजकोट, अहमदाबाद आणि पाटन शहराला भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर लोक घाबरुन घराबाहेर आले. या भूकंपाचे केंद्र कच्छ जिल्ह्यात भचाऊपासून उत्तर उत्तरपूर्व दिशेला १३ किमी अंतरावर होते. या भूकंपात कोणतीही हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.