भूमध्यसागरात ५० निर्वासितांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:59 AM2018-06-05T01:59:04+5:302018-06-05T01:59:04+5:30

भूमध्यसागरात दक्षिण भागात एक बोट उलटून ५० हून अधिक निर्वासितांचा मृत्यू झाला आहे. या बोटीची क्षमता ७५ ते ९० लोकांची असताना यातून १८० लोक जात होते.

50 immigrants die in the Mediterranean Sea | भूमध्यसागरात ५० निर्वासितांचा बुडून मृत्यू

भूमध्यसागरात ५० निर्वासितांचा बुडून मृत्यू

googlenewsNext

सफाक्स (ट्यूनिशिया) : भूमध्यसागरात दक्षिण भागात एक बोट उलटून ५० हून अधिक निर्वासितांचा मृत्यू झाला आहे. या बोटीची क्षमता ७५ ते ९० लोकांची असताना यातून १८० लोक जात होते. यापैकी ६८ नागरिकांना वाचविण्यात यश आले आहे. मृतात बहुतांश ट्यूनिशिया आणि तुर्कीच्या नागरिकांचा समावेश आहे.
ट्यूनिशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशाच्या दक्षिण किनाºयालगत ४८ मृतदेह आढळून आले आहेत. हा भाग सफाक्स शहराच्या नजिक आहे. या दुर्घटनेतून वाचलेल्या ट्यूनिशियाच्या वाएल फरजानाी यांनी सांगितले की, या बोटीत क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी बसले होते. बोटीत पाणी घुसले आणि त्यानंतर काही प्रवाशांनी समुद्रात उड्या घेतल्या तर काही
जण बुडाले. (वृत्तसंस्था)

१२0 जणांना वाचविले
सफाक्समधील नौदलाच्याय तळावरील कर्मचारी मोहम्मद सलाह यांनी सांगितले की, लोकांचा शोध घेण्यासाठी तपास मोहिम सुरुच आहे. ट्यूनिशियातील नागरिक नेहमीच युरोपात स्थलांतर करीत असतात.
रोजगाराच्या शोधात ते भूमध्यसागरामार्गे प्रवास करतात. मार्चमध्ये अशाच दुर्घटनातून ट्यूनिशियाच्या १२० नागरिकांना वाचविण्यात आले होते. ते इटलीला जाण्याच्या प्रयत्नात होते.

निर्वासितांनी बॅगा भराव्यात : इटलीमधील अशा निर्वासितांची संख्या कमी करणे आणि या नागरिकांना देशातून बाहेर काढण्याची प्रक्रि या वेगवान करण्याचा निर्धार इटलीचे नवे गृहमंत्री मटेओ साल्विनी यांनी केला आहे. शनिवारी एका रॅलीत बोलताना ते म्हणाले की, अवैध निर्वासितांचे चांगले दिवस संपले आहेत. त्यांनी परत जाण्यासाठी आपल्या बॅगा भराव्यात.

Web Title: 50 immigrants die in the Mediterranean Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू