नायजेरियात मशिदीमध्ये दहशतवादी हल्ला, 50 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 04:24 PM2017-11-21T16:24:16+5:302017-11-21T16:51:23+5:30
नायजेरियातील पूर्वोत्तर भागात असलेल्या मुबी शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
मुबी : नायजेरियातील पूर्वोत्तर भागात असलेल्या मुबी शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
येथील स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदमावा राज्यातील मुबी शहरात असलेल्या मशिदीजवळ हा आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. यावेळी मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी अनेक नागरिकांची गर्दी होती. या स्फोटात जवळपास 50 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
The Latest: Death toll in northern Nigeria suicide bombing at mosque rises to 50, police say. https://t.co/wSiOhFD2lz
— AP Africa (@AP_Africa) November 21, 2017
दरम्यान, हा हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नाही. मात्र येथील बंडखोर बोको हराम या संघटनेने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशाप्रकारचे हल्ले करण्यासाठी बोको हरामकडून लहान मुलांचा आणि महिलांचा वापर करण्यात येते. नायजेरियातील अदमावामध्ये 2014 मध्ये बोको हरामने बंड करुन हा प्रदेश ताब्यात घेतला होता. मात्र, 2014 मध्ये येथील लष्कराने त्यांच्यावर हल्लावरुन त्यांच्या ताब्यातून हा प्रदेश काढून घेतला होता.
BREAKING: Death toll in northern Nigeria suicide bombing at mosque rises to 50, police say.
— AP Africa (@AP_Africa) November 21, 2017