'गे' नाईट क्लबवर अंदाधुंद गोळीबार, 50 जणांचा मृत्यू, तर 53 जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2016 05:02 PM2016-06-12T17:02:25+5:302016-06-12T21:14:42+5:30
अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असलेल्या पल्स गे नाईट क्लबमध्ये सध्या अंदाधुंद गोळीबार सुरू असून, या गोळीबारात सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.
ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. १२ : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असलेल्या पल्स गे नाईट क्लबमध्ये सध्या अंदाधुंद गोळीबार सुरू असून, या गोळीबारात सुमारे ५० जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. तर यामध्ये 53 हून जास्त लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी ७ च्या सुमारास क्लबमध्ये काही बंदूकधारी अज्ञात लोक घुसले. या लोकांनी क्लबमध्ये असलेल्या लोकांना ओलिस ठेवल्याचेही सांगण्यात येत आहे.
आरटी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या गोळीबारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे मात्र, क्लबच्या आतील स्थिती काय आहे. दरम्यान, यातील हल्लेखोरांकडे आत्मघाती बॉम्बही असून, यातील एका हल्लेखोराने आत्मघाती बॉम्ब शरीरावर बांधून ठेवल्याचे समजते.
ऑरलँडो पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलरवरही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या क्लबपासून लोकांनी शक्य तितक्या दूर राहावे, असे अावाहनही पोलिसांनी केले आहे. तसेच सोशल मीडियावर नागरिकांकडूनही या हल्ल्याबाबत माहिती देण्यात येत आहे.
अमेरिकेतील एका पत्रकारानेही ट्विटरवर माहिती देताना म्हटले आहे की, हल्लेखोरांनी लोकांना क्लबमध्ये बंधक केले आहे. काही नागरिकही या वृत्ताबाबतची माहिती सोशल मीडियावरून देत आहेत.
Pulse nightclub shooting: Approximately 20 people dead inside the club.
— Orlando Police (@OrlandoPolice) June 12, 2016
Pulse Shooting: If you have any information, call @FBI Hotline: 1-800-CALL FBI
— Orlando Police (@OrlandoPolice) June 12, 2016