नेपाळमध्ये भूकंपात ५,0०० ठार; भारतात धक्के

By Admin | Published: April 26, 2015 02:36 AM2015-04-26T02:36:46+5:302015-04-26T02:36:46+5:30

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये शनिवारी सकाळी लागोपाठ बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हाहाकार घडविला.

5,000 earthquakes killed in Nepal earthquake Bump into India | नेपाळमध्ये भूकंपात ५,0०० ठार; भारतात धक्के

नेपाळमध्ये भूकंपात ५,0०० ठार; भारतात धक्के

googlenewsNext

काठमांडू/ नवी दिल्ली : हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये शनिवारी सकाळी लागोपाठ बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हाहाकार घडविला. या महाकाय भूकंपात सुमारे पाच हजार नागरिक मृत्युमुखी पडले. नेपाळची राजधानी काठमांडू व इतर शहरांतील शेकडो इमारती उद््ध्वस्त झाल्या. या भूकंपाने भारतातही ५१ बळी घेतले.

नेपाळच्या ७५ पैकी
२९ जिल्ह्यांमध्ये हानी

१०० वर्षांहून जुना धरहरा टॉवर व दरबार चौकातील वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त

प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचीही झाली पडझड

भारताकडून नेपाळला शक्य ती सर्व मदत तातडीने देण्याचे निर्देश

हवाई दलाच्या विमानाने ५५ भारतीयांना आणले मायदेशी; आणखी २०० जण रविवारी परतणार

एव्हरेस्टवर हिमस्खलन; बेस कॅम्पवरील १८ गिर्यारोहकही ठार

सायंकाळपर्यंत नेपाळला ५ ते ६.६ तीव्रतेचे तब्बल १६ आफ्टरशॉक्स

संूपर्ण नेपाळ शोकग्रस्त; जागोजागी आक्रोश, जखमींसाठी धावळप

टॉवरखाली २०० मृतदेह
काठमांडूच्या मध्य वस्तीत असलेला धरहरा टॉवर जमीनदोस्त झाला. काठमांडूचे नयनरम्य दर्शन घेण्यास हजारो नागरिक या टॉवरला भेट देत. या भूकंपाने ५०.५ मीटर उंचीच्या या ऐतिहासिक टॉवरखाली सुमारे २०० मृतदेह आढळले.

महाराष्ट्रातील
600
पर्यटक अडकले
नवी दिल्ली : नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ६०० पर्यटक असून, ते सारेच सुरक्षित असल्याचे सरकारी स्तरावर सांगण्यात येत आहे. मुंबई, नागपूर व पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनास गेले होते. याशिवाय खासगी पर्यटन कंपन्यांकडून आणि कुटुंबांसह पर्यंटनासाठी गेलेल्यांचा शोध बारत सरकारच्या मदतीने राज्य सरकारचे अधिकारी घेत आहेत.

राज्य शासनाची हेल्पलाइन
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ०२२-२२०२७९९० ही हेल्पलाइन सुरू केली. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल़ केंद्र सरकारच्या यंत्रणेशीही सातत्याने संपर्क राखला जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितले.

 

Web Title: 5,000 earthquakes killed in Nepal earthquake Bump into India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.