५१ जणांचा मृत्यू; शेकडो घरे, गाड्या जळून खाक; १९ हेलिकॉप्टर विझवताहेत आग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:47 AM2024-02-05T09:47:07+5:302024-02-05T09:47:35+5:30
१९ हेलिकॉप्टर व ४५० हून अधिक कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे.
१९ हेलिकॉप्टर विझवताहेत आग
विना देर मार : तापमानातील वाढ आणि उष्णतेच्या तीव्र झळेमुळे चिलीतील जंगलांना भीषण आग लागली. ही आग नागरी वस्तीपर्यंत पोहोचल्याने जवळपास ११०० घरे जळून खाक, तर किमान ५१ जणांचा मृत्यू झाला. आगीची तीव्रता पाहता राष्ट्रपती गेब्रियल बोरिक यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. १९ हेलिकॉप्टर व ४५० हून अधिक कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे.
४३ हजार हेक्टर जंगल खाक
nचिलीत सुमारे १५८ ठिकाणी आगी लागल्या आहेत. त्यामुळे सुमारे ४३ हजार हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले.
nअनेक भागांत धुरांचे लोट पसरले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता काही भागात संचारबंदीही लागू केल्याचे गृहमंत्री तोहा यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या वणव्याच्या घटना
ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात ७ फेब्रुवारी २००९ रोजी लागलेल्या आगीत १७३ जणांचा मृत्यू झाला, तर २,००० हून अधिक घरे खाक.
ग्रीसमध्ये जुलै २०१८ मध्ये लागलेल्या वणव्यात १०३ जणांचा मृत्यू झाला, तर २००७ मधील आगीत ६७ जणांचा जळून मृत्यू.
अल्गेरियात २०२१ मध्ये लागलेल्या वणव्यात ३३ जवानांसह ९० जणांचा, तर २०२२च्या वणव्यात ३७ जणांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात २०१८ मधील वणव्यात ८५ नागरिकांचा मृत्यू झाला. हा वणवा दोन आठवडे सुरू होता.
पोर्तुगालमध्ये २०१७ मध्ये ५ दिवस सुरू असलेल्या वणव्यात ६३ जणांचा मृत्यू झाला होता. तापमान वाढ हे आगीचे मुख्य कारण आहे.