वाघा सीमेवर स्फोटात ५२ ठार

By admin | Published: November 3, 2014 04:08 AM2014-11-03T04:08:35+5:302014-11-03T04:08:35+5:30

पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५२ जण ठार, तर २०० जण जखमी झाले

52 killed in bomb blasts | वाघा सीमेवर स्फोटात ५२ ठार

वाघा सीमेवर स्फोटात ५२ ठार

Next

वाघा सरहद्द (पाकिस्तान) : पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५२ जण ठार, तर २०० जण जखमी झाले. वाघा सरहद्दीवर रेंजर्सचा ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोराने या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ जात स्वत:ला स्फोटाने उडविले. मृतांमध्ये ११ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी अल-कईदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या जनदऊल्लाह या संघटनेने स्वीकारली आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पोलीस महानिरीक्षक मुश्ताक सुखेरा यांनी सांगितले की, दररोज नेहमीप्रमाणे ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक गर्दी करतात. रविवारी हा कार्यक्रम पाहून लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोर एकाप्रवेशद्वाराजवळ पोहोचला आणि त्याने स्फोट करून स्वत:ला उडविले. मृतांमध्ये तीन पाकिस्तानी रेंजसचा समावेश आहे. मुहर्रमच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी रेंजर्सनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती; परंतु, आत्मघाती बॉम्बर शोधणे कठीण असते, असे सुखेरा यांनी सांगितले.
आधीच्या वृत्तात हा सिलिंडरचा स्फोट असावा, असे सांगण्यात आले होते. आमच्या पथकांनी हा आत्मघाती स्फोट असल्याचे सांगितले. या स्फोटासाठी ५ किलो स्फोटके वापरण्यात आली. हल्लेखोर परेड मैदानाच्या दरवाजाजवळ थांबला. लोक या दरवाजाजवळ जमल्यानंतर त्याने स्फोट केला. पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या वाघा सीमेवरील चौकीनजीकच्या रेस्टॉरन्टच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला. घटनास्थळी बॉलबेअरिंग्ज सापडल्याचे अन्य एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून जखमींना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.सर्व २०० जखमींना लाहोरमधील विविध इस्पितळात हलविण्यात आल्याचे घुरकी इस्पितळच्या एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: 52 killed in bomb blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.