ऑनलाईन गेमच्या नादात गमावले ५२ लाख, खात्यात उरले केवळ ५ रुपये, कुटुंब झालं कंगाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 08:52 PM2023-06-10T20:52:29+5:302023-06-10T20:55:24+5:30

Online Gaming: कुठल्याही गोष्टीचं व्यसन खूप वाईट असतं. असाच काहीसा प्रकार एका कुटुंबासोबत घडला आहे. या कुटुंबातील एका मुलीच्या ऑनलाईन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कुटुंबाचे लाखो रुपये बुडाले आहेत.

52 lakh lost in online game, only 5 rupees left in account, family became poor | ऑनलाईन गेमच्या नादात गमावले ५२ लाख, खात्यात उरले केवळ ५ रुपये, कुटुंब झालं कंगाल 

ऑनलाईन गेमच्या नादात गमावले ५२ लाख, खात्यात उरले केवळ ५ रुपये, कुटुंब झालं कंगाल 

googlenewsNext

कुठल्याही गोष्टीचं व्यसन खूप वाईट असतं. असाच काहीसा प्रकार एका कुटुंबासोबत घडला आहे. या कुटुंबातील एका मुलीच्या ऑनलाईन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कुटुंबाचे लाखो रुपये बुडाले आहेत. या १३ वर्षीय मुलीच्या ऑनलाईन गेम खेळण्याच्या सवयीमुळे कुटुंबाला लाखो रुपये गमवावे लागले आहेत. 

 ही घटना चीनमधील असून, येथील एका १३ वर्षीय मुलीचा ऑनलाईन गेमिंगचा नाद तिच्या कुटुंबाला चांगलाच महागात पडला आहे. या व्यसनामुळे या मुलीच्या कुटुंबाला ४४९,५०० युआन म्हणजेच तब्बल ५२ लाख १९ हजार ८०९ रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. वेळ अशी आली की, मुलीच्या या व्यसनामुळे मुलीच्या आईच्या बँक खात्यामध्ये केवळ ५ रुपयेच उरले आहेत.

या मुलीने तिच्या आईच्या डेबिट कार्डचा वापर ऑनलाईन टूल, गेम्स आणि इन-गेम्स आयटम्स खरेदी करण्यासाटी केला. याबाबतचा खुलासा या मुलीच्या शिक्षकांना संशय आल्यानंतर झाला. शिक्षकांना ही मुलगी ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागल्याचा संशय होता. शिक्षकांनी सांगितले की, शाळेच्या वेळेमध्ये मुलीच्या फोनचा स्क्रिन यूज टाइम अधिक होता.

रिपोर्ट्सनुसार माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या आईने तिच्या बँक अकाउंटची डिटेल्स चेक केली. त्यामध्ये मुलीच्या आईला तिच्या बँक अकाऊंटमध्ये केवळ ०.५ युआन अवघे ५ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले.

वडिलांनी याबाबत विचारणा केल्यावर या मुलीने धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, हे पैसे गेम्स, इन गेम पर्चेस आणि आपल्या १० क्लासमेट्ससाठीही ऑनलाईन गेम खरेदी करण्यावर खर्चे केले. तसेच यात तिने सुमारे एक लाख रुपये खर्च केले.  

Web Title: 52 lakh lost in online game, only 5 rupees left in account, family became poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.