बांगलादेशात ५,३०० संशयित गुन्हेगारांना अटक

By admin | Published: June 13, 2016 06:38 AM2016-06-13T06:38:21+5:302016-06-13T06:38:21+5:30

बांगलादेशात अल्पसंख्य समाज आणि निधर्मी लेखकांच्या हत्यासत्रानंतर ८५ अतिरेक्यांसह ५,३०० संशयित गुन्हेगारांना अटक करण्यात आली

5,300 suspected criminals arrested in Bangladesh | बांगलादेशात ५,३०० संशयित गुन्हेगारांना अटक

बांगलादेशात ५,३०० संशयित गुन्हेगारांना अटक

Next


ढाका : बांगलादेशात अल्पसंख्य समाज आणि निधर्मी लेखकांच्या हत्यासत्रानंतर ८५ अतिरेक्यांसह ५,३०० संशयित गुन्हेगारांना अटक करण्यात आली. केंद्र सरकारने धार्मिक अतिरेक्यांचा कठोरपणे बीमोड करण्याचे ठरविले असून, ही उपाययोजना त्याचाच भाग आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादाविरोधात देशपातळीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २,१२८ लोकांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यात ४८ जण वेगवेगळ्या अतिरेकी संघटनांशी संबंधित आहेत. त्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी ३,१९२ लोकांना अटक झाली होती.

Web Title: 5,300 suspected criminals arrested in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.