चार वर्षांत ५३२ रजा, बायडेन यांचा अनोखा विक्रम; अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 09:18 AM2024-09-09T09:18:07+5:302024-09-09T09:18:31+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या रजांचा मोडला विक्रम

532 vacations in four years, Joe Biden unique record; It happened for the first time in the history of America | चार वर्षांत ५३२ रजा, बायडेन यांचा अनोखा विक्रम; अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं

चार वर्षांत ५३२ रजा, बायडेन यांचा अनोखा विक्रम; अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चार वर्षांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात ५३२ दिवसांची रजा घेतली आहे. त्यांच्या एकूण कार्यकाळापैकी हे ४० टक्के दिवस रजेत गेले असून, त्यांनी ७९४ दिवस काम केले आहे. या संदर्भात अमेरिकेतील दैनिकांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. बायडेन यांनी पदभार स्वीकारून १,३२७ दिवस झाले आहेत. त्यांपैकी ५३२ दिवस त्यांनी रजा घेतल्या आहेत. अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने घेतलेल्या सर्वाधिक रजा आहेत.

इतरांना लागतील ४८ वर्षे ■ बायडेन यांनी प्रत्येक १० दिवसांमध्ये ४ दिवस रजा घेतली आहे. अमेरिकेत एखाद्या कर्मचाऱ्याला सरासरी ११ दिवसांची रजा एका वर्षात मिळते. बायडेन यांनी जेवढ्या रजा घेतल्या, तेवढ्या रजा घेण्यास सर्वसामान्य नागरिकाला ४८ वर्षे लागतील.

जगात उलथापालथ अन् राष्ट्राध्यक्ष रजेवर जगभरात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. तरीही अमेरिकेचे राष्ट्रपती समुद्रकिनाऱ्यावर रजेचा आनंद घेत आहेत. त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावरून अनेकांनी टीकाही • केली आहे. मात्र, बायडेन यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष रजेवर असतानाही काम करत होते. महत्त्वाचे फोन कॉल्स ते घेत होते. त्यांना सहज संपर्क करता येत होता. 

कोणी किती रजा घेतल्या? टक्के २६ रजा ट्रम्प यांनी घेतल्या होत्या. ११ टक्के रजा बराक ओबामा, रोनाल्ड रिंगन यांनी घेतल्या.

Web Title: 532 vacations in four years, Joe Biden unique record; It happened for the first time in the history of America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.