56 कोटी युझर्सना तात्काळ पासवर्ड बदलण्याची गरज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 02:01 PM2017-05-17T14:01:30+5:302017-05-17T15:03:26+5:30

वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी लोकांचे वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती झाली आहे

56 million users need to change password immediately! | 56 कोटी युझर्सना तात्काळ पासवर्ड बदलण्याची गरज !

56 कोटी युझर्सना तात्काळ पासवर्ड बदलण्याची गरज !

Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 17 - ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी युझर्स वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 10 प्रसिद्ध वेबसाइटवरून युझर्सची माहिती हॅकर्सनं चोरली असल्याचा शोध क्रॉमटेक सिक्युरिटी रिसर्चर सेंटरनं लावला आहे. त्यामुळे जीमेल आणि याहूसारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाइट हाताळणा-या युझर्सना तात्काळ पासवर्ड बदलण्याची सूचना करण्यात आली आहे. क्रॉमटेक सिक्युरिटी रिसर्चर सेंटरनं एक वेबसाइटही डेव्हलप केली आहे.

Have I Been Pwned या वेबसाइटवर तुम्ही तुमचा यूझर्स नेम किंवा इमेल आयडी टाकल्यास तुम्हाला तुमचा पासवर्ड हॅक झाल्याची माहिती मिळणार आहे. तसेच कोणत्या वेबसाइटद्वारे तुमचे पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत, त्या वेबसाइटचीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्रॉमटेकचे संशोधक बॉब डाइकेंको यांच्यामते, 243.6 दशलक्ष युझर्सचे इमेल अॅड्रेस आणि पासवर्ड लिंक्डइन, ड्रापबॉक्स, लास्ट एफएम, मायस्पेस, अडोब, नेओपेट्स, टुम्ब्लर आणि इतर वेबसाइटच्या माध्यमातून हॅक करण्यात आले आहेत. या वेबसाइटवरून डेटाबेस चोरलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नाही, मात्र संशोधकांनी त्या हॅकर्सला "एडी" असे नाव दिले आहे. मोंगो डीबीसारखे डेटा बेस प्रोग्रॅम असुरक्षित असल्याचंही बॉब डाइकेंको म्हणाले आहेत. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात होस्ट केलेला अनेक टेराबाइट डेटा मोंगो डीबीच्या माध्यमातून चोरण्यात आल्याची शक्यताही बॉब डाइकेंको यांनी व्यक्त केली आहे. 
(पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या 8 सोप्या टिप्स)
पासवर्ड बनविण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी मात्र अवश्य घेतली पाहिजे. आठवण्यास सोपा असलेला पासवर्ड वापरण्यास सोपा असतो, पण आर्थिक देवाणघेवाण जेथे होते त्या वेबसाईटवर असे सोपे पासवर्ड वापरणे सुरक्षित नसते. पासवर्ड चोरीला जाण्याचा जागा वेगवेगळ्या असू शकतात. काही व्हायरस मध्ये कीलॉगर हा सोफ्टवेअर वापरलेला असतो. 
 
 
तसेच जर कोणाला तुमचे पासवर्ड चोरायचे असेल तर अशा व्यक्ती, तुम्ही वापरीत असलेल्या सार्वजनिक संगणकावर हा सोफ्टवेअर वापरून तुमचा पासवर्ड चोरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक संगणकावर इंटरनेट वापरताना अधिक काळजी घ्यावी. आपण यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजू शकतो. व प्रत्येक उपायाचा परिणाम हा भिन्न भिन्न असतो. सुरक्षित पासवर्ड बनवणे हा उपाय तुम्हाला इंटरनेट वर ह्याक होणाऱ्या पासवर्ड चोरीपासून वाचवू शकतो. जाणून घ्या पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या 8 सोप्या टिप्स 
 
तुमचा पासवर्ड मोठा असू द्या. पासवर्डमध्ये किमान आठ कॅरेक्टर अवश्य द्या. पण त्यापेक्षा जास्त कॅरेक्टर असणारा पासवर्ड कधीही चांगला ठरेल.
 
पासवर्डमध्ये अल्फा न्यूमरीक असावा. यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक अंक आणि एखादं स्पेशल कॅरॅक्टर असावं. जसे की - Abcd@789
 
कधीही आपल्या स्वत:चं किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर आधारित पासवर्ड बनवू नका
 
पासवर्ड सेट करताना अशा अंकांचा वापर करु नका जे तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे, उदाहरणार्थ वाढदिवस, जन्मसाल, मोबाईल नंबर इत्यादी.
 
कधीही एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी विविध नंबरचा उपयोग करा
 
आपला पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा
 
डिक्शनरीतले शब्द शक्यतो टाळा, असे शब्द हॅक होण्याची शक्यता जास्त असते. जसे की - Ne@r (Near) वगैरे.
 
तुमच्या आवडत्या वाक्याच्या पहिल्या अक्षराचा मिळून पासवर्ड तयार करा. उदाहरणार्थ the quick brown fox jumps over the lazy dog या वाक्याचं पहिलं अक्षर मिळवून tqbfjotld असा पासवर्ड तयार होईल.

 

Web Title: 56 million users need to change password immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.