पाकिस्तानात हत्या करणाऱ्या ६ जणांना फाशीची शिक्षा; श्रीलंकन नागरिकाला जाळले हाेते जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 08:47 AM2022-04-20T08:47:18+5:302022-04-20T08:47:27+5:30
लाहाेरच्या दहशतवादविराेधी न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला आहे. एकूण ८९ जणांना हत्येप्रकरणी विविध गुन्ह्यांतर्गत दाेषी ठरविण्यात आले.
इस्लामाबाद : पाकिस्तानात गेल्यावर्षी इशनिंदेच्या आराेपांवरून झालेल्या प्रियांथ कुमारा या श्रीलंकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी ६ जणांना फाशीची शिक्षा ठाेठावण्यात आली आहे. ७ जणांना जन्मठेप व ७६ जणांना प्रत्येकी दाेन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. प्रियांथा कुमारा यांची हत्या करण्यात आली हाेती.
लाहाेरच्या दहशतवादविराेधी न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला आहे. एकूण ८९ जणांना हत्येप्रकरणी विविध गुन्ह्यांतर्गत दाेषी ठरविण्यात आले. ९ अल्पवयीन आराेपींबाबत निर्णय दिलेला नाही. खटल्याची बंदद्वार सुनावणी झाली. त्यानंतर न्या. नताशा नसीम यांनी सर्वांना शिक्षा सुनावली. प्रियांथा कुमारा हे सियालकाेट येथे एका कारखान्यात सुमारे ७ वर्षांपासून व्यवस्थापक पदावर कार्यरत हाेते. तेथील कामगारांनी कुमारा यांना जिवंत जाळले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ही घटना घडली होती. सुमारे ८०० लोकांच्या संतप्त जमावाने कारखान्यावर हल्ला केला होता.