बाबो! 1, 2 हजार नाही तर 6 वर्षांच्या मुलाने वडिलांच्या फोनवरून ऑर्डर केलं 80 हजारांचं जेवण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:30 PM2023-02-03T17:30:05+5:302023-02-03T17:34:16+5:30
वडील नियमितपणे आपल्या 6 वर्षाच्या मुलाला झोपण्यापूर्वी अर्धा तास गेम खेळण्यासाठी मोबाईल देत असत.
हल्ली स्मार्टफोनची क्रेझ एवढी वाढली आहे की लहान मुलांनाही त्याचे व्यसन लागले आहे. लहान मुलांना व्हिडीओ पाहण्यासाठी आणि फोनवर गेम खेळण्यासाठी पालकांना मोबाईल देताना आपण अनेकदा पाहतो. पण काही वेळा असं करणं पालकांना चांगलंच महागात पडू शकतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. वडील नियमितपणे आपल्या 6 वर्षाच्या मुलाला झोपण्यापूर्वी अर्धा तास गेम खेळण्यासाठी मोबाईल देत असत.
गेम खेळण्याऐवजी, मुलाने फूड डिलिव्हरी एप उघडले आणि अनेक रेस्टॉरंटमधून मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ ऑर्डर केले, $1000 म्हणजेच जवळपास 82,000 चे खाद्यपदार्थ मागवले. वडिलांना वाटलं की मुलगा गेम खेळत आहे पण मुलाने भलताच कारनामा केला होता. इतकेच नाही तर मुलाने प्रत्येक ऑर्डरवर 25% टिपही दिली. जेव्हा दरवाजाची बेल वाजत राहिली आणि एकामागून एक पदार्थ येऊ लागले तेव्हा वडिलांना काहीतरी घडल्याची जाणीव झाली.
पहिला हॅप्पी रेस्टॉरंटमधून सँडविच आणि लियोमधून आइस्क्रीम मागवलं. यापुढेही जेवण येतच राहिले, ज्यामध्ये सॅलड, चिली चीज फ्राईज, आईस्क्रीम, ग्रेप लीव, राईस यासह अनेक पदार्थांचा समावेश होता. वडिलांनी बँक अकाऊंट पाहिलं तर त्यांच्या खात्यातून पैसे गेले होते. त्यांना मुलाच्या कारनाम्याची माहिती मिळताच धक्का बसला. मुलाने हे खाद्यपदार्थ ऑर्डर केले होते. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"