बापरे! TikTok चॅलेंजचा नाद जीवावर बेतला, चिमुकलीने गिळले तब्बल 23 मॅग्नेट; अशी झाली अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 01:05 PM2021-09-27T13:05:56+5:302021-09-27T13:13:35+5:30

6 year old girl swallows 23 magnets while trying tiktok challenge : 6 वर्षांच्या मुलीने मोबाईलवर TikTok Challenge पूर्ण करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकल्याची घटना घडली आहे.

6 year old girl swallows 23 magnets while trying tiktok challenge | बापरे! TikTok चॅलेंजचा नाद जीवावर बेतला, चिमुकलीने गिळले तब्बल 23 मॅग्नेट; अशी झाली अवस्था

बापरे! TikTok चॅलेंजचा नाद जीवावर बेतला, चिमुकलीने गिळले तब्बल 23 मॅग्नेट; अशी झाली अवस्था

googlenewsNext

स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे आता लहान मुलंदेखील मोबाईलचा सर्रास वापर करताना दिसतात. मात्र मुलांच्या हातात फोन देणं पालकांना चांगलंच महागात पडत असल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. TikTok चॅलेंजचा नाद एका चिमुकलीच्या जीवावर बेतला आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका 6 वर्षांच्या मुलीने मोबाईलवर TikTok Challenge पूर्ण करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकल्याची घटना घडली आहे. तिने टिकटॉक चॅलेजसाठी तब्बल  23 मॅग्नेट गिळले आहेत. 

The Sun ने दिलेल्या वृत्तानुसार, East Sussex मध्ये राहणाऱ्या सहा वर्षाच्या मुलीने गेमच्या नादात तब्बल 23 लोहचुंबक गिळले. जेव्हा तिच्या पोटात दुखू लागलं आणि वारंवार तिल्या उलट्या होऊ लागल्या तेव्हा पालक तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी लगेचच तिचं ऑपरेशन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहून या मुलीने लोहचुंबक गिळले होते.

इंग्लंडच्या या सहा वर्षीय मुलीने मोबाईलवर व्हिडीओ पाहताना TikTok Challenge पूर्ण करण्यासाठी लोहचुंबक गिळले होते. डॉक्टरांनी तिच्या पोटाची सर्जरी करून हे मॅग्नेट बाहेर काढले. मॅग्नेटमुळे तिच्या आतड्यांना खूप नुकसान पोहोचलं होतं. जेव्हा आई वडिलांना आपल्या मुलीने मॅग्नेट गिळले आहेत हे माहिती झालं तेव्हा त्यांनी तिच्या रूमची झडती घेतली. तेव्हा त्यांना मॅग्नेट आढळले. वेळीच ही बाब लक्षात आल्याने मुलीचा जीव वाचला, अन्यथा यात तिचा मृत्यू होण्याची शक्यता होती.

मॅग्नेटमुळे या मुलीच्या आतड्यांना जखम

मुलीचं ऑपरेशन करणारे पीडियाट्रिक सर्जन कोस्टा हीली यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅग्नेटमुळे या मुलीच्या आतड्यांना जखम झाली होती. तिला वेळेत रुग्णालयात आणलं नसतं तर परिस्थिती बिघडली असती. त्यांनी पालकांना सल्ला दिला की लहान मुलांच्या आसपास ते गिळतील अशा काही वस्तू असल्यास त्या त्यांच्या नजरेपासून दूर ठेवाव्या. मॅग्नेट शरीरासाठी घातक ठरू शकतं. मुलीच्या पालकांनीही इतर पालकांना सल्ला दिला आहे की आपली लहान मुलं मोबाईलचा नेमका काय वापर करत आहेत याकडे लक्ष द्या म्हणजेत अशा दुर्घटना होणार नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: 6 year old girl swallows 23 magnets while trying tiktok challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.