नायजेरियात 60 ओलीस मुलींची सुटका
By admin | Published: July 8, 2014 01:38 AM2014-07-08T01:38:17+5:302014-07-08T03:26:02+5:30
नायजेरियातील बोको हराम दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या 6क् महिला व मुलींनी अपहरणकत्र्याच्या तावडीतून सुटका करून घेतली असून, आपल्या घरी परतल्या आहेत.
Next
मैदुगरी (नायजेरिया) : नायजेरियातील बोको हराम दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या 60 महिला व मुलींनी अपहरणकत्र्याच्या तावडीतून सुटका करून घेतली असून, आपल्या घरी परतल्या आहेत.
स्थानिक सतर्कता समितीचे सदस्य अब्बास गावा यांना त्यांच्या सहका:यांकडून संदेश मिळाला आहे, त्यानुसार 60 मुली गेल्या शुक्रवारी त्यांच्या घरी पोहोचल्या आहेत. बोर्नो प्रांताची राजधानी मैदुगरीमधील एका उच्चस्तरीय सूत्रने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर हे वृत्त खरे असल्याचे सांगितले; पण हे सांगण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. अब्बास गावा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींना ताब्यात ठेवणारे दहशतवादी लढाईसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी महिला-मुलींनी तेथून पळ काढला. दहशतवादी दुस:या मोहिमेत गुंतल्याचे पाहून त्यांनी पाऊल उचलले. शुक्रवारी दाम्बोआत दहशतवादी व लष्करात झालेल्या चकमकीत 5क्हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. (वृत्तसंस्था)