Japan Earthquake : जपानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 6.1 ची नोंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 08:02 AM2024-04-02T08:02:36+5:302024-04-02T08:03:24+5:30
Japan Earthquake : या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.
टोक्यो : जपान पुन्हा एकदा जोरदार भूकंपाने हादरला आहे. उत्तर जपानमधील इवाते आणि आओमोरी प्रांतात मंगळवारी भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली.
जपानच्या हवामान संस्थेच्या हवाल्याने रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू इवाते प्रांताचा उत्तर किनारपट्टी भाग होता. जपानी मीडियाच्या वृत्तानुसार, सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही. हवामान खात्याने सुनामीबाबत कोणताही इशारा दिला नसल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
An earthquake with a preliminary magnitude of 6.1 hit Iwate and Aomori prefectures in northern Japan on Tuesday. The epicentre was the northern coastal part of Iwate Prefecture, reports Reuters citing Japan Meteorological Agency
— ANI (@ANI) April 1, 2024
यापूर्वी, नवीन वर्षाच्या दिवशी पश्चिम जपानमध्ये झालेल्या भूकंपामुळे 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच, अनेक इमारती, वाहने आणि बोटींचेही नुकसान झाले होतो. त्यावेळी नागरिकांना घरांपासून दूर राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 जानेवारी रोजी इशिकावा प्रांत आणि जवळच्या परिसतात भूकंपाचे अनेक हादरे जाणवले होते. यामध्ये 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचाही समावेश होता, त्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला होता.
भूकंप का येतात?
पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील उर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि त्यानंतर भूकंप होतो.