Sunita Williams: 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक, 150 हून अधिक प्रयोग अन्...; सुनीता विल्यम्स यांनी 9 महिने अंतराळात काय-काय केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 05:53 IST2025-03-19T05:50:13+5:302025-03-19T05:53:11+5:30
Sunita Williams Return : सुनीता विल्यम्स या गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचाच होता. मात्र, काही तांत्रिक समस्यांमुळे तो लांबला आणि त्यांना तब्बल 9 महिने तेथेच थांबावे लागले. यानंतर आता त्या पुन्हा पृथ्वीवर परतल्या आहेत. आपल्या या मोहिमेत त्यांनी अंतराळात बरीच महत्वाची कामे केली...

Sunita Williams: 62 तास 9 मिनिटे स्पेसवॉक, 150 हून अधिक प्रयोग अन्...; सुनीता विल्यम्स यांनी 9 महिने अंतराळात काय-काय केलं?
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आपल्या सहकाऱ्यांसोबत तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झाले. त्या गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचाच होता. मात्र, काही तांत्रिक समस्यांमुळे तो लांबला आणि त्यांना तब्बल 9 महिने तेथेच थांबावे लागले. यानंतर आता त्या पुन्हा पृथ्वीवर परतल्या आहेत. आपल्या या मोहिमेत त्यांनी अंतराळात बरीच महत्वाची कामे केली आहेत.
सुनिता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकावरील आपल्या 9 महिन्यांच्या काळात, साधारणपणे फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या या अंतराळ स्थानकाची देखभाल आणि स्वच्छता केली. याशिवाय, त्यांनी येथील जुनी उपकरणेही बदलली आणि काही वैज्ञानिक प्रयोगही केली.
62 तासा 9 मिनिटे स्पेसवॉक अर्थात 9 वेळा स्पेसवॉक -
नासाच्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या टीमने 900 तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी 150 हून अधिक प्रयोगही केले. याच बरोबर, सुनीता विल्यम्स यांनी, 'अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला' म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल 62 तास 9 मिनिटे घालवली अर्थात 9 वेळा स्पेसवॉक केले.
नवे रिअॅक्टर्स विकसित केले -
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो हे दिसून येते. त्यांनी पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्यासंदर्भात संशोधन केले.
हेही वाचा - पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? पाहा VIDEO
येथे सुनीता विल्यम्स यांनी बायोन्यूट्रिएंट्स प्रोजेक्टमध्येही भाग घेतला होता. यात शास्त्रज्ञ मंडळी बॅक्टेरिया वापरून पोषक तत्वे तयार करण्याच्या पद्धतीचे अध्ययन करतात. या प्रोजेक्टमुळे अंतराळवीरांना ताजी पोषक तत्वे मिळण्यास मदत होऊ शकते.