रशियात विमान कोसळून 62 प्रवासी ठार, दोन भारतीयांचा समावेश
By admin | Published: March 19, 2016 08:30 AM2016-03-19T08:30:36+5:302016-03-19T13:43:00+5:30
दुबईहून रशियाला जाणारे एक विमान दक्षिण रशियातील रोस्तोव-ऑन-डॉनमध्ये कोसळून ६१ प्रवासी ठार झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. १९ - रशियामध्ये एका प्रवासी विमानाला लँडिंग करताना झालेल्या अपघातात क्रू मेंबर्ससह विमानातील सर्व 62 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृत प्रवाशांमध्ये दोघा भारतीयांचाही समावेश आहे. दुबईहून रशियाला जाणारे हे विमान रशियातील दक्षिण भागातील रोस्तोव-ऑन-डॉनमध्ये पडले आणि हा दुर्दैवी अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्लायदुबई FZ981 हे विमान रोस्तोव-ऑन-डॉन येथे लँड करत असताना कोसळले आणि अवघ्या काही क्षणांच संपूर्ण विमानाने पेट घेतला. एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि स्थानिक आपत्कालीन सेवेतील अधिका-यांनी या दुर्घटनेची पुष्टी दिली असून विमानातील ५५ प्रवासी व ६ क्रू मेंबर्ससह सर्वांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले.
मात्र या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. दरम्यान या दुर्घटनेनंतर हे विमानतळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून इतर विमानांच्या उड्डाणात बदल करण्यात आले आहेत. ही दुर्घटना वादळी वाऱ्यांमध्ये विमान सापडल्याने झाली असावा असा अंदाज रोस्तोव प्रांताचे गव्हर्नर वासुली गोलूबोव यांनी व्यक्त केला आहे.
Nationalities of victims from the passengers of Fly Dubai plane in Russia include:
— Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 19, 2016
44 Russians
8 from Ukraine
2 from India
1 from Uzbekistan