चीनमधल्या किंडरगार्डनमध्ये बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू

By admin | Published: June 15, 2017 05:54 PM2017-06-15T17:54:20+5:302017-06-15T20:16:17+5:30

चीनमधल्या जिआंग्सू प्रांतातल्या फेंगजिआन परिसरात संध्याकाळी 4.50 वाजताच्या दरम्यान हा बॉम्बस्फोट झाला आहे.

7 killed in bomb blast in kindergarten in China | चीनमधल्या किंडरगार्डनमध्ये बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू

चीनमधल्या किंडरगार्डनमध्ये बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत

बीजिंग, दि. 15 - चीनच्या पूर्वेकडील किंडरगार्डन परिसरात बॉम्बस्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला असून, 59 जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

चीनमधल्या जिआंग्सू प्रांतातल्या फेंगजिआन परिसरात संध्याकाळी 4.50 वाजताच्या दरम्यान हा बॉम्बस्फोट झाला आहे. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, चीनच्या एका प्ले स्कूलच्या गेटवर हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. या स्फोटात आतापर्यंत 59 जण जखमी झाले आहेत.

सोशल मीडियावर काही फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यात लहान मुले जखमी अवस्थेत पडलेली पाहायला मिळत आहेत. मात्र व्हायरल झालेले फोटो त्याच घटनेचे आहेत की नाही, याबाबत अस्पष्टता आहे. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं स्वीकारली नाही. स्फोटाच्या घटनेनंतर चीनमधल्या अनेक शाळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, शेजारील देशांशी बिघडलेल्या संबंधांमुळे चीनमध्ये प्ले स्कूलवर यापूर्वी देखील हल्ले करण्यात आले आहेत

 

Web Title: 7 killed in bomb blast in kindergarten in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.