कोरोना पेक्षाही 7 पट घातक महामारी येण्याची शक्यता; 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू! WHO नं दिला असा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 03:44 PM2023-09-25T15:44:30+5:302023-09-25T15:46:04+5:30
Disease X : ही महामारी कोरनापेक्षाही 7 पट घातक असू शकते आणि या महामारिमुळे किमान 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. जागतिक आरोग्यसंघटनेने या महामारीला (WHO) डिसीज एक्स (Disease X) असे नाव दिले आहे.
कोरोणा व्हायरस अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. जगात काही ठिकाणी अजूनही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. यातच, आता तज्ज्ञ आणखी एका महामारीची शक्यता वर्तवत आहेत. ही महामारी कोरनापेक्षाही 7 पट घातक असू शकते आणि या महामारिमुळे किमान 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. जागतिक आरोग्यसंघटनेने या महामारीला (WHO) डिसीज एक्स (Disease X) असे नाव दिले आहे.
तज्ज्ञांचा इशारा -
नवी महामारी येत आहे आणि ती कोरोनापेक्षाही अधिक घातक ठरू शकते, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, डिसीज एक्स (Disease X) संदर्भात तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. तसेच, कोविड-19 ही केवळ महामारीची सुरूवात आहे. जर या आजाराने महामारीचे रूप धारण केले, तर यामुळे किमान 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे ब्रिटनच्या व्हॅक्सिन टास्क फोर्सच्या प्रमुख केट बिंघम (KATE BINGHAM) यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर, या आजाराचा सामना करणेही एक मोठे आव्हान ठरू शकते. कारण हा आजार कोरोना-19 पक्षेही घातक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोना व्हायरस पेक्षाही घातक आहे डिसीज एक्स -
केट बिंघम (KATE BINGHAM) म्हणाल्या, डिसीज एक्स (Disease X) हा कोरोनाच्या तुलनेत 7 पट अधिक घातक असू शकतो. पुढील महामारी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या एखाद्या व्हायरसपासूनच येऊ शकते. 1918-19 मध्ये एक महामारी आली होती. जी आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या महामारीपासून आली होती. तेव्हा जगातील 5 कोटींहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच, वैज्ञानीक व्हायरस संदर्भात अधिक माहिती मिळवत असल्याचेही केट बिंघम यांनी म्हटले आहे.