आत्मघाती हल्ल्यांत येमेनमध्ये ७0 ठार
By Admin | Published: October 10, 2014 03:40 AM2014-10-10T03:40:09+5:302014-10-10T03:40:09+5:30
येमेनमध्ये गुरुवारी करण्यात आलेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये ७0 जण ठार झाले. राजधानी सनात शिया बंडखोरांच्या समर्थनार्थ गोळा झालेल्या लोकांना लक्ष्य करून आत्मघाती स्फोट घडविण्यात आला
सना : येमेनमध्ये गुरुवारी करण्यात आलेल्या दोन आत्मघाती हल्ल्यांमध्ये ७0 जण ठार झाले. राजधानी सनात शिया बंडखोरांच्या समर्थनार्थ गोळा झालेल्या लोकांना लक्ष्य करून आत्मघाती स्फोट घडविण्यात आला; तर दुसऱ्या एका हल्ल्यात अल-काइदाच्या आत्मघाती हल्लेखोराने लष्करी तपासणी नाक्यावर स्फोट घडवून आणला. दोन्ही हल्ल्यांत ७0 जण ठार झाले. मृतांत २0 सैनिकांचा समावेश आहे.
राजधानी सनातील स्फोटात डझनभर लोक जखमीही झाले आहेत. निदर्शने करण्यासाठी शिया बंडखोरांचे समर्थक सनाच्या अल-तहरीर चौकात गोळा झाले असताना हा हल्ला करण्यात आला. मे २०१२ मधील हल्ल्यानंतरचा राजधानीतील हा सर्वात भीषण हल्ला ठरला. २०१२ मध्ये अल-काइदाने लष्करी ताफ्यावर हल्ला केला होता व त्यात १०० लोक ठार झाले होते. (वृत्तसंस्था)