पाकमधील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान

By admin | Published: September 29, 2016 12:30 AM2016-09-29T00:30:08+5:302016-09-29T00:30:08+5:30

रीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट

70 percent loss of film business in Pakistan | पाकमधील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान

पाकमधील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान

Next

लाहोर : उरीतील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. हे संबंध बिघडल्यास आणि हिंदी चित्रपटावर बंदी आल्यास पाकिस्तानातील चित्रपट व्यवसायाचे ७० टक्के नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग ढोणी याच्या जीवनावरील शुक्रवारी प्रदर्शित होणारा चित्रपटही पाकिस्तानात न दाखविण्याचा निर्णय तेथील वितरकांनी घेतला आहे.
चित्रपट व्यावसायिकांना अशी भीती आहे की, परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर भारतीय चित्रपटावर येथे बंदीची मागणी होऊ शकते. एक वितरक सिनेप्लेक्सचे मालक नदीम मंडविवल्ला यांनी सांगितले की, मी निराशावादी नाही; पण वस्तुस्थिती ही आहे की, गत काही वर्षांत हिंदी आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित झाल्याने पाकिस्तानच्या चित्रपट व्यवसायाला एक उंची मिळाली आहे. मी एवढीच अपेक्षा करतो की, दीर्घ काळासाठी हा तणाव राहायला नको. काही काळापुरते प्रतिबंध लावले तर आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही; पण दीर्घ काळासाठी जर प्रतिबंध लावले, तर अनेक टॉकीज आणि मल्टीप्लेक्स बंद पडतील.
चित्रपट समीक्षक उमर अलवी यांनी सांगितले की, सिनेमा टॉकीज आणि महसूल वाढल्याने पाकिस्तानातील चित्रपट उद्योगाने कात टाकली आहे. हा व्यवसाय चांगला चालण्यासाठी वर्षातून किमान ५० ते ६० चित्रपट तयार व्हायला हवेत; पण एवढ्या चित्रपटांची येथे निर्मिती होत नाही.(वृत्तसंस्था)

सलमान खानची मध्यस्थी
दिग्दर्शक-निर्माता करण जोहर यांच्या आगामी चित्रपटात पाक कलावतं असल्याच्या कारणास्तव न मुंबई व महाराष्ट्रात प्रदर्शित न होउ देण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्यानंतर अभिनेता सलमान खान याने त्या वादात मध्यस्थी करण्याचे ठरविले आहे.
सलमान खान स्वत: राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. मनसेने पाक कलावंतांवर बंदी घालण्याची घोषणा करण्याआधी आधी हा चित्रपट तयार झाला असल्याने तो प्रदर्शित होण्यात अडथळे आणू नये, अशी भूमिका तो मांडणार असल्याचे कळते.

तो निर्णय केंद्र सरकारने घ्यावा - सैफ अली खान
भारतीय चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार असावेत का किंवा पाकिस्तानी कलावंतांचे कार्यक्रम भारतात व्हावेत का, याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, असे अभिनेता सैफ अली खानने म्हटले आहे.
सरकार जो निर्णय घेईल, तो सारेच मान्य करतील असे सांगून तो म्हणाला की, या प्रश्नाबाबत सतत उलटसुलट चर्चा होत असते. त्यावर एकच कायमस्वरूपी निर्णय सरकारने घेतल्यास वाद निर्माण हेणार नाहीत.

Web Title: 70 percent loss of film business in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.