पाकिस्तानात 700 भटक्या कुत्र्यांची हत्या
By admin | Published: August 5, 2016 03:54 PM2016-08-05T15:54:27+5:302016-08-05T15:54:27+5:30
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये यासाठी कराची शहरात सातशेहून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
कराची, दि. 5 - भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये यासाठी कराची शहरात सातशेहून अधिक कुत्र्यांना विष देऊन ठार मारण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांत भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने अधिका-यांनी नियंत्रण आणण्याच्या हेतूने या कुत्र्यांना ठार करण्याचा निर्णय घेतला होता. शहरांमध्ये अनेक ठिकाणी कुत्र्यांचे मृतदेह रस्त्यावर पडले असून महापालिकेचे अधिकारी त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम करत आहेत.
'गेल्या काही दिवसांत कराचीमधील दोन परिसरात सातशेहून अधिक कुत्र्यांना ठार करण्यात आलं आहे', अशी माहिती महापालिकेचे अधिकारी सत्तार जावेद यांनी दिली आहे.
मांसाहारातून विष देऊन कुत्र्यांना ठर करण्यात आलं आहे. प्राणीमित्र या घटनेचा निषेध करत आहेत. मात्र लोकांना धोका असल्याने हा निर्णय घेण गरजेचं होतं असं मोहम्मद झाहीद या अधिका-याने सांगितलं आहे. गतवर्षी भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने 6500 लोकांवर कराचीमधील जिन्नाह रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. यावर्षी आत्तापर्यत 3700 प्रकरणं समोर आली आहेत अशी माहिती डॉ सीमीम जमाली यांनी दिली आहे.