७00 शरणार्थींचा बोटी बुडून मृत्यू

By admin | Published: May 30, 2016 03:18 AM2016-05-30T03:18:22+5:302016-05-30T03:18:22+5:30

काही जहाजे भूमध्य सागरात बुडाल्याने वा फुटल्याने किमान ७00 जण मरण पावल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थीविषयक विभागाने (यूएनएचसीआर) व्यक्त केली

700 refugees die drowning | ७00 शरणार्थींचा बोटी बुडून मृत्यू

७00 शरणार्थींचा बोटी बुडून मृत्यू

Next


पोझ्झॅलो (इटली) : स्थलांतरांना अवैधरीत्या आणणारी काही जहाजे भूमध्य सागरात बुडाल्याने वा फुटल्याने किमान ७00 जण मरण पावल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थीविषयक विभागाने (यूएनएचसीआर) व्यक्त केली आहे. हे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. हे सारे शरणार्थी स्मगलिंगच्या बोटी वा जहाजांतून युरोपात येण्याच्या प्रयत्नात होते.
बुधवारी शरणार्थींना आणणारी एक बोट बुडाल्याने १00 जण बेपत्ता झाले असून, ते मरण पावल्याची शंका आहे. इटलीच्या नौदलाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. बोट बुडत असल्याची छायाचित्रे नौदलाने टिपली असून, त्यातून हा प्रकार समोर आला आहे.
लिबियाच्या साब्रता बंदराहून स्थलांतरितांना युरोपकडे घेऊन येणारी एक बोट गुरुवारी सकाळी भूमध्य सागरात बुडाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील ५५0 जणांचाही पत्ता लागला नसून, ते सर्व जण बुडून मरण पावले असावेत, अशी शंका आहे.
>लिबियातून स्थलांतर, असंख्य बेपत्ता
लिबियातून अवैध मार्गाने आणि स्मगलिंगच्या बोटीतून मोठ्या प्रमाणात शरणार्थी युरोपकडे येत असून, त्यापैकी बरेच जण आतापर्यंत मरण पावले आहेत.
बेपत्ता झालेल्यांचे प्रमाणही मोठे असून, त्यातील काही जण मरणच पावले असावेत, अशी शंका आहे. बोटी फुडणे, जहाज फुटणे अशी त्याची कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: 700 refugees die drowning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.