जपानवरील अणुबॉम्ब हल्याला ७१ वर्षे....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2016 05:28 AM2016-08-09T05:28:27+5:302016-08-09T05:28:27+5:30
हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यात सुमारे १ लाख ४० हजार नागरिक ठार झाले होते. ९ ऑगस्ट रोजी नागासाकी वर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ : दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर विध्वासंक अणुबॉम्ब टाकले होते यामध्ये अनेक निरापराध लोकांचे बळी गेले होते. हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यात सुमारे १ लाख ४० हजार नागरिक ठार झाले होते. ९ ऑगस्ट रोजी नागासाकी वर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता. कित्येक जण त्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या आगीत ठार झाले. नंतर कितीतरी जखमी आणि स्फोटामुळे निर्माण झालेल्या किरणोत्सर्गाने आजारी पडून आठवड्यात, महिन्यात आणि वर्षात मरण पावले. तीन दिवसांनंतर नागासाकी शहरावर अमेरिकेने दुसरा अणुबॉम्ब टाकला, त्यात ७४ हजार लोक ठार झाले होते.
जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. मात्र आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. मात्र, रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला. त्यानंतर दुसरा अणुबॉम्ब हल्ला ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर केला होता .
लास अॅलोमास - विध्वंस जन्माला घालणारं गाव!
मेरिका, कॅनडा आणि इंग्लंडनं मिळून हाती घेतलेलं अणुबॉम्ब तयार करण्याचं मिशन. त्याला अमेरिकेनं 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' असं नाव दिलं. लाखभर संशोधकांना हातीशी धरून अमेरिकेनं दोन अणुबॉम्ब तयार केलं. छोट्या बॉम्बचं नाव होतं 'लिटिल बॉय' अन् मोठ्या बॉम्बचं नाव होतं 'फॅट मॅन'.
'लिटिल बॉय' तयार झाल्यानंतर ६ ऑगस्ट १९४५ च्या सकाळी सव्वा आठच्या सुमारास हिरोशिमावर टाकला गेला. त्यानंतर तीनच दिवसांनी ९ ऑगस्ट १९४५ च्या भल्या पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांनी नागासाकी शहरावर अमेरिकेनं 'फॅट मॅन' नावाचा अणुबॉम्ब टाकला. या दोन्ही महाभयंकर स्फोटांनी जपानमध्ये विध्वंस घडविला. तब्बल ३ लाखांहून अधिक बळी घेतले. अणुबॉम्बचा स्फोट होऊन ज्वाळा उसळल्या. जमीन ४ हजार अंश सेल्सिअसपर्यंत तापली. या स्फोटात १ लाख ४० हजार लोक मरण पावले. जे वाचले तेही नंतरच्या काळात किरणोत्साराने मृत्यू पावले.