धक्कादायक! शास्त्रज्ञांना सापडलं डायनासोरचं भ्रुण, धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 05:01 PM2021-12-23T17:01:37+5:302021-12-23T17:02:10+5:30

शास्त्रज्ञांना दक्षिण चीनमध्ये डायनासोरच्या अंड्याचा एक जीवाश्म सापडला आहे, ज्यामध्ये डायनासोरचं भ्रूण जतन करुन ठेवण्यात आले आहे. हे अंड ६६-७२  मिलियन (७ कोटी २० लाख) वर्षांपूर्वीचं आहे. सापडलेल्या या भ्रूण ‘बेबी यिंगलियांग’(Baby Yingliang) या नावानं ओळखलं जाणार आहे.

72-million-year-old perfectly preserved Dinosaur embryo discovered inside a fossilised egg in China | धक्कादायक! शास्त्रज्ञांना सापडलं डायनासोरचं भ्रुण, धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता

धक्कादायक! शास्त्रज्ञांना सापडलं डायनासोरचं भ्रुण, धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता

googlenewsNext

माणसाच्या उत्क्रांती आधी पृथ्वीवर महाकाय डायनासॉर होते ही गोष्ट आपल्याला माहित आहे. शास्त्रज्ञांना दक्षिण चीनमध्ये डायनासोरच्या अंड्याचा एक जीवाश्म सापडला आहे, ज्यामध्ये डायनासोरचं भ्रूण जतन करुन ठेवण्यात आले आहे. हे अंड ६६-७२  मिलियन (७ कोटी २० लाख) वर्षांपूर्वीचं आहे. सापडलेल्या या भ्रूण ‘बेबी यिंगलियांग’(Baby Yingliang) या नावानं ओळखलं जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. हा भ्रूण दक्षिण चीनमधील जिआंग्झी प्रांतातील गांझू शहरातील शाहे इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘हेकोऊ फॉर्मेशन’च्या खडकांच्या खाली आढळला आहे.

डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार, बेबी यिंगलियांग अंड्यातील भ्रूण पूर्णपणे वाढ झालेलं आहे. त्याचं डोकं शरीराच्या खाली होतं, त्याची पाठ अंड्याच्या आकारानुसार वळालेली होती आणि त्याचे पाय डोक्याच्या दिशेला होते. ओविराप्टोरोसॉर (oviraptorosaurs) हे ६.७-इंच लांब अंड्याच्या आत विकसित होऊ शकतात, त्यानंतर जन्माला आल्यावर डोक्यापासून शेपटीपर्यंत सुमारे 10.6 इंच लांब असू शकतात.

बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या (University of Birmingham) जीवाश्मशास्त्रज्ञांनी सांगितलं की, हा भ्रूण ओविराप्टोरोसॉर प्रजातीचा आहे, ज्याला दात आणि चोच नव्हती. ओविराप्टोरोसॉर पंख असणारे डायनासोर होते, जे आशिया आणि उत्तर अमेरिकेतील पर्वतरांगांमध्ये आढळून येत होते. या डायनासोरचा गर्भ अगदी एखाद्या पक्षाच्या गर्भासारखाच दिसून येतो. हा भ्रूण (embryo)विकासाच्या अवस्थेतील एखाद्या पक्ष्यांपेक्षा फारसा वेगळा दिसत नाही. त्यांची चोच आणि शरीराचा आकार वेगळा असायचा. हा भ्रूण आतापर्यंत सापडलेला सर्वात ‘पूर्णपणे ज्ञात डायनासोर भ्रूण’ आहे.

याबाबतच्या एडिनबर्ग विद्यापीठातील पृष्ठवंशीय जीवाश्मशास्त्रज्ञ flon waisum ma (फ्लॉन वैसुम मा) यांनी एका निवेदनात म्हटलंय की, “मी पाहिलेला हा डायनासोरचा अंड्यातील गर्भ हा सर्वात सुंदर जीवाश्मांपैकी एक आहे. हा जीवाश्म खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे याचा अभ्यास उत्तम प्रकारे कराता येईल. आम्ही ‘बेबी यिंगलिआंग’च्या शोधाबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत.”

Web Title: 72-million-year-old perfectly preserved Dinosaur embryo discovered inside a fossilised egg in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.