विश्वचषक फुटबॉल आयोजनावर 72} जनता निराश
By admin | Published: June 5, 2014 01:00 AM2014-06-05T01:00:39+5:302014-06-05T01:00:39+5:30
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची जगभरात मोठय़ा प्रमाणावर चर्चा होत असली, तरी खुद्द यजमान देशातील 72 टक्के जनता या स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीबाबत नाखूष आहे
Next
>ब्राझील : येथे खेळल्या जाणा:या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची जगभरात मोठय़ा प्रमाणावर चर्चा होत असली, तरी खुद्द यजमान देशातील 72 टक्के जनता या स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीबाबत नाखूष आहे. ब्राझील देशाची कमजोर झालेली अर्थव्यवस्था आणि मोठय़ा प्रमाणावर वाढलेली बेरोजगारी या पाश्र्वभूमीवर करण्यात आलेल्या सव्रेक्षणात या देशातील 72 टक्के नागरिकांनी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन येथील प्यु रिसर्च सेंटर्स संस्थेने केलेल्या सव्रेक्षणात ही बाब पुढे आली आहे. या देशातील जनतेत केवळ स्पर्धेच्याच बाबतीत नव्हे, तर या देशाचे राष्ट्रपती डिल्मा रुसेस यांच्याबाबतदेखील तितकीच नाराजी आहे. या स्पर्धेचे आयोजन करणो देशाच्या दृष्टीने वाईट बाब असल्याचे दहापैकी सहा नागरिकांनी सांगितले.