CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:47 PM2020-04-28T15:47:20+5:302020-04-28T17:51:45+5:30
इराणमध्ये कोरोनावरील उपचारासंदर्भात एक अफवा पसरली होती. या अफवेने एक-दोन नव्हे तर शेकडो लोकांचा बळी घेतला. एवढेच नाही, तर अनेकांना आपली दृष्टीही गमवावी लागली आहे.
तेहरान : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या एका अफवेमुळे इराणमध्ये हजारो लोक इंडस्ट्रिअल अल्कोहोल प्यायले. यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचे आता इराण सरकारने मान्य केले आहे. इराणमध्ये, काही दिवसांपूर्वी, अल्कोहोल घेऊन कोरोनावर उपचार केला जाऊ शकतो, अशी अफवा सोशल मीडियावर पसरली होती. यानंतर येथील शेकडो मुलांसह हजारो नागरिक इंडस्ट्रिअल अल्कोहोल प्यायले. या घटनेनंतर 728 जणांचा मृत्यू झाल्याचे इराण सरकारने म्हटले आहे.
इराणमधील मृतांची गणती करणाऱ्या कार्यालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, इंडस्ट्रिअल अल्कोहोल प्यायल्याच्या घटनेनंतर केवळ 728 लोकांचा मृत्यूच झाला असे नाही, तर शेकडो लोक अंधही झाले आहेत. यात अनेक मुलांचाही समावेश आहे. अल जजीराने दिलेल्या एका वृत्तानुसार, विष प्यायल्याने मृत्यू झालेल्यांच्या यादीतच यांचाही समावेश करण्यात आला आहे. हे सर्व लोक कोरोना संक्रमणावरील उपचारासंदर्भातील औषधाच्या अफवेचे बळी ठरले आहेत.
कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा
5000 लोकांनी पयले मिथेनॉल -
इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता कियानौश जहांपोर यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 5011 लोक या अफवेमुळे इंडस्ट्रिअल अल्कोहोल प्यायले. एवढेच नाही, तर अनेकांनी आपल्या मुलांनाही ते पाजले. यातील अनेक जण अंध झाले आहेत. अंध होणाऱ्यांच्या संख्येत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्वांनी एका अफवेनंतर अल्कोहोल शोधायला सुरुवात केली होती. मात्र, ते न मिळाल्याने त्यांनी मिथेनॉल घेतले.
Coronavirus : कनिका कपूर कोरोनाग्रस्तांना देऊ शकत नाही रक्त, 'हे' आहे कारण
मेथेनॉलचा वास आणि चव दारू सारखीच असते. पण, ते थेट मानवाच्या डोक्यावरच हल्ला करते. इराणमध्येही कोरोनाने थैममान घातले होते. मात्र आता येथे कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसते. येथे आतापर्यंत 91,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर 5,806 जणांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus: मुस्लिमांकडून भाज्या खरेदी करू नका; भाजपा आमदाराचं धक्कादायक विधान